हुतात्मा दत्ताराम कोयंडे शाळेचा १११ वा स्थापना दिन साजरा

नित्यानंद तळवडकर यांची उपस्थिती

मालवण दि प्रतिनिधी आचरा पिरावाडी येथील हुतात्मा दत्ताराम भाऊ कोयंडे प्राथमिक शाळेचा १११ वा वर्धापन दिन सोहळा शाळा समिती अध्यक्ष नित्यानंद तळवडकर यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी त्यांच्या सोबत मुख्याध्यापक सुभाष नाटेकर, ग्रामपंचायत सदस्या अनुष्का गावकर,पोलीस पाटील विठ्ठल धुरी, संजय जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी शिष्यवृत्ती परीक्षेतील गुणवत्ता धारक विद्यार्थी कु. रुद्र जाधव व कु . वीर आचरेकर यांचा सत्कार ग्रामपंचायत सदस्या श्रीम.अनुष्का गावकर यांच्या हस्ते करण्यात आला. त्याच प्रमाणे रुद्र बागवे आणि तनिष्का वारंग हेही शिष्यवृत्ती परीक्षा उत्तीर्ण झाले यांचा तसेचे मार्गदर्शक शिक्षक श्रीम.परब व श्रीम .गोसावी यांचाही सत्कार करण्यात आला. यावेळी संजय जाधव व महेंद्र वारंग यांनी या शाळेची मुले वेगवेगळ्या क्षेत्रात दैदिप्यमान प्रगती करून शाळेचे नाव उंचावत आहेत. हे शाळेसाठी आम्हा पालकांसाठी भूषणावह असल्याचे मत व्यक्त केले. तर अनुष्का गावकर यांनीही शिष्यवृत्ती प्राप्त विद्यार्थ्यांना आपल्या आयुष्यात यशाची वेगवेगळी शिखरे अशीच पादाक्रांत करून आपले पालक, शाळा आणि समाजाचे नावलौकीक वाढवावी अशा शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन कु .रिया गावकर व कु . मयुरेश धुरी या मुलांनी केले .स्वागत श्रीम. उदगीरे यांनी केले.तर आभार मुख्याध्यापक श्री. सुभाष नाटेकर यांनी मानले.

You cannot copy content of this page