कुडाळ,कणकवली,वेंगुर्ले व देवगड फेऱ्याही सुरू;आगारप्रमुख सचिदानंद बोवलेकर यांचे प्रवाशांना लाभ घेण्याचे आवाहन
मालवण दि प्रतिनिधी मालवण एसटी आगारातून आज बुधवार पासून मालवण- रत्नागिरी व मालवण कोल्हापूर या बसफेऱ्या सुरू करण्यात आल्याची माहिती आगारप्रमुख सचेतन बोवलेकर यांनी दिली. तसेच कुडाळ, कणकवली वेंगुर्ले, देवगड या मार्गावर फेऱ्या सुरू करण्यात आल्या असून त्याचा लाभ प्रवाशांनी घ्यावा, असे आवाहन बोवलेकर यांनी केले आहे. दरम्यान,आज पुन्हा मालवण आगारात एक चालक आणि एक वाहक असे दोघेजण कामावर हजर झाले मालवण आगारातून बुधवारी सकाळी ८ वाजता मालवण- रत्नागिरी ही बस फेरी सुटणार आहे दुपारी २.३० वाजता रत्नागिरीहून रत्नागिरी मालवण अशी बस सुटणार आहे. दुपारी २ वाजता मालवण- कोल्हापूर तर सायंकाळी ६.१५ वाजता कोल्हापूर येथून कोल्हापूर – मालवण बस सुटणार आहे मालवण कुडाळ रेल्वे स्टेशन या मार्गावर (सकाळी ८ वाजता, ९ वाजता ११ वाजता, दुपारी १२ वाजता २ वाजता, सायंकाळी ४ वाजता ५ वाजता, ७.४५ वाजता) ८ बसफेऱ्या सुरू करण्यात आल्या आहेत. मालवण- कणकवली (सकाळी ७ वाजता, दुपारी ३.३० वाजता), मालवण-कसाल ( दुपारी १ वाजता) मालवण-देवगड (सकाळी ७.४५, दुपारी १ वाजता), मालवण वेंगुर्ले (सकाळी ८ वाजता, दुपारी २ वाजता) अशा बसफेऱ्या सुरु करण्यात आल्याची माहिती बोवलेकर यांनी दिली आहे. मालवण आगारातील २२८ पैकी ६ कर्मचाऱ्यांना बडतर्फ २६ कर्मचाऱ्यांची सेवा समाप्ती, ७ कर्मचाऱ्यांचा मार्ग बंद १५ कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आली आहे. ज्या कर्मचाऱ्यांवर कारवाई झालेली नाही, अशा १७६ जणांवर कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. मालवण आगारात सध्या १६ चालक, ६ वाहक, १ चालक तथा वाहक असे १३ कर्मचारी, तर मेकॅनिक विभागात ३ व प्रशासकीय विभागात ११ कर्मचारी हजर झाले आहेत. मालवण आगारात बदली झालेले २१ कर्मचारी आहेत परंतु अद्याप ते मालवण आगारात हजर झालेले नाही. परिवहनमंत्री अनिल परब यांनी केलेल्या आवाहनानुसार एसटी कर्मचाऱ्यांनी कामावर हजर व्हावे, असे आवाहन बोवलेकर यांनी केले आहे.
