‘विद्याविहार’चे दोन विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेत चमकले

*⚡सावंतवाडी ता.१२-:* तालुक्यातील आजगाव येथील विद्याविहार इंग्लिश स्कूलचे दोन विद्यार्थी माध्यमिक शालांत शिष्यवृत्ती परीक्षेत चमकले आहेत. काजल सुनील मुळीक व विराज अनंत प्रभुसाळगावकर या विद्यार्थ्यांनी माध्यमिक शालांत शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश संपादन केले आहे.

यशस्वी विद्यार्थ्यांचे शालेय समितीचे अध्यक्ष रामचंद्र ऊर्फ अण्णा झांट्ये यांच्यासह पालक व ग्रामस्थांनी अभिनंदन केले आहे. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना शाळेतील शिक्षक उत्तम भागीत, अरुण गवस, मानसी परूळेकर, काव्या साळवी यांचे मार्गदर्शन लाभले.

You cannot copy content of this page