*⚡कणकवली ता.१२-: सिंधुदुर्ग जिल्हा क्रीडा संकुलाच्यावतीने आयोजित ज़िल्हास्तरीय युवा महोत्सवांतर्गत ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आलेल्या लोकनृत्य स्पर्धेत येथील एस.एम. ज्युनिअर कॉलेजच्या संघाने द्वितीय क्रमांक पटकावला. युवकांच्या सुप्त गुणांना वाव देण्यासाठी संपूर्ण राज्यात युवा महोत्सव साजरा केला जातो. सिंधुदुर्ग जिल्हा क्रीडा संकुल यांच्यावतीने युवा महोत्सवाच्या निमित्ताने विविध स्पर्धा घेण्यात आल्या. या स्पर्धा ऑनलाईन पद्धतीने आयोजित केल्या होत्या.
या युवा महोत्सवात ‘लोकनृत्य’ या कलाप्रकारासाठी जिल्ह्यातील विविध कनिष्ठ महाविद्यालयांनी सहभाग घेतला. या स्पर्धेत एस.एम. जुनिअर कॉलेजमधील अकरावीच्या विद्यार्थ्यांच्या संघाने द्वितीय क्रमांक पटकावला. या संघातील सर्व विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रे व स्मृतिचिन्ह देऊन जिल्हा क्रीडा अधिकारी यांच्याहस्ते गौरविण्यात आले. कणकवली शिक्षण संस्थेचे चेअरमन डॉ. एस. एन. तायशेटे, सचिव डी. एम. नलावडे, उपकार्याध्यक्ष एम. ए. काणेकर तसेच विद्यालयाचे प्राचार्य ए. जी. पोतदार यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. या विद्यार्थ्यांना सांस्कृतिक विभाग विभागातील प्रा. एम. आर. पाटील, प्रा. मिलिंद गुरव, प्रा. सी. डी. हिर्लेकर, प्रा. ए. ए. जगदाळे, प्रा. आर. एल. प्रधान यांनी विशेष मार्गदर्शन व सहकार्य केले. एस.एम. ज्युनिअर संघाच्या या घवघवित यशाबद्दल सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.
