Headlines

Global Maharashtra Breaking News

यंगस्टार मित्रमंडळाच्या अध्यक्षपदी अण्णा कोदे

उपाध्यक्ष प्रवीण आळवे, सचिवपदी नंदू वाळके *⚡कणकवली ता.२७-:* कणकवली शहरातील सामाजिक सांस्कृतिक क्षेत्रात गेली अनेक वर्षे कार्यरत असणाऱ्या यंगस्टार मित्र मंडळ कणकवलीच्या अध्यक्षपदी सुरेंद्र उर्फ अण्णा कोदे यांची निवड करण्यात आली आहे. तर या मंडळाच्या उपाध्यक्षपदी प्रवीण आळवे यांची निवड करण्यात आली. या मंडळाच्या नवीन कार्यकारिणीची निवड जाहीर करण्यात आली असून, कार्यकारिणीच्या सचिवपदी विठ्ठल उर्फ…

Read More

मालवण एसटी आगार येथे मराठी भाषा गौरव दिन साजरा

मालवण ता.२७-:* मालवण एसटी आगार येथे रविवारी मराठी भाषा गौरव दिन मराठी पत्रकार परिषदेचे कोकण विभागीय सचिव जेष्ठ पत्रकार नंदकिशोर महाजन यांच्या हस्ते कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून साजरा करण्यात आला. यावेळी आगार लेखापाल उदय खरात, वाहतूक नियंत्रक अमोल कामते, बाळा मालंडकर, वरिष्ठ लिपिक विनोद शंकरदास, पत्रकार अमित खोत आदी उपस्थित होते. मराठी पत्रकारितेच्या…

Read More

दो बुंद जिंदगी के…

जिल्हाधिकारी के मंजुलक्ष्मी यांच्या हस्ते बालकांना डोस पाजून राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहिमेस प्रारंभ सिंधुदुर्गनगरी ता.२७-:* येथील जिल्‍हा सामान्‍य रुग्‍णालयात झिरो ते पाच वर्षे वयोगटातील बालकांना जिल्‍हाधिकारी के. मंजुलक्ष्‍मी यांच्‍या हस्‍ते पोलिओचा डोस पाजून पल्‍स पोलिओ मोहिमेचा प्रारंभ झाला.          यावेळी जिल्‍हाधिकारी के. मंजुलक्ष्‍मी यांनी बालकांना घेऊन आलेल्‍या मातांना गुलाब पुष्‍प देऊन त्‍यांचे स्‍वागत केले. जिल्हा…

Read More

शिवसेना नेते संदेश पारकर यांनी घेतले श्री देव कुणकेश्वराचे दर्शन

कुणकेश्वर यात्रा नियोजनाचा घेतला आढावा कणकवली ता.२७-:* शिवसेना नेते संदेश पारकर यांनी श्री देव कुणकेश्वराचे दर्शन घेऊन यात्रा नियोजनाचा आढावा घेतला. यावेळी कुणकेश्वर देवस्थान ट्रस्टी आणि ग्रामस्थांनी श्री.पारकर यांना यात्रा नियोजनाची माहिती दिली. तसेच यात्रा नियोजन संदर्भात काही मागण्या किंवा समस्या असतील तर खासदार विनायक राऊत आणि पालकमंत्री उदय सामंत यांच्यामार्फत त्या प्राधान्याने सोडविल्या जातील…

Read More

सायकलपटूंनी दिला पर्यावरण संवर्धनचा संदेश

कनक रायडर्स सायकल क्लबतर्फे कणकवलीत सायकल स्वारी कणकवली ता.२७-:* आरोग्यासाठी व पर्यावरणाच्या संवर्धनासाठी लयभारी असा संदेश ३०० हून अधिक सायकलपटूंनी दिला . कनक रायडर्स सायकल क्लबतर्फे इन्स्पायर सिंधुदुर्ग २०२२ सायकल रॅलीचे आयोजन केले . या रॅलीचे उदघाटन आमदार वैभव नाईक व नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्या उपस्थित झाले . यावेळी सभापती मनोज रावराणे,उपसभापती मिलिंद मेस्त्री, पोलीस…

Read More

मराठी आपल्या संस्कारांची भाषा:डी.पी.तानावडे मराठी राजभाषादिनानिमित्त नगरवाचनालयात पुस्तकांचे प्रदर्शन

कणकवली ता.२७-:* मराठी आपल्या संस्कारांची भाषा आहे ग्लोबल युगात मराठी भाषेचा अधिकाधिक प्रसार होण्यासाठी मराठी माणसाने पुढाकार घ्यावा,असे आवाहन जिल्हा ग्रंथालयाचे उपाध्यक्ष डी पी तानावडे यांनी केले मराठी राजभाषा दिनानिमित्त कणकवली नगरवाचनालयात मराठी पुस्तकांचे प्रदर्शन आयोजित केले होते.या प्रदर्शनाचे उद्घाटन श्री तानावडे यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी ते बोलत होते. यावेळी बाचनालयाचे कार्यवाह हनिफ…

Read More

रुग्णालयातील ऑपरेशन थिएटरला देणार मोड्युलर लूक…

आमदार दीपक केसरकर यांची माहिती; डायलिसिस रुग्णाचा वेळ घालवण्यासाठी दिली टिव्ही भेट सावंतवाडी ता.२७-:* उपजिल्हा रुग्णालयातील ऑपरेशन थिएटरला मॉड्यूलर लूक देण्यात येणार असून, शस्त्रक्रियेसाठी वस्तू व साधने स्टेनलेस स्टील पासून बनवलेली असणार आहेत. यासाठी दोन कोटीचा निधी खर्च करण्यात येणार आहे. यावेळी डायलिसिस साठी येणाऱ्या रुग्णांचा वेळ जावा यासाठी आमदार दीपक केसरकर यांनी स्वतःचा खर्चाने…

Read More

महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेची प्राथमिक फेरी मालवणात

मालवण ता.२७-:महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या विभागाच्या वतीने आयोजित ६० व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेची प्राथमिक फेरी मालवण केंद्रावर मामा वरेरकर नाट्यगृह येथे होत आहे. २ ते ११ मार्च या कालावधीत सायंकाळी ७ वाजता दहा नाटकांचा आस्वाद नाट्यप्रेमींना घेता येणार आहे. यामध्ये दि. २ मार्च रोजी अक्षरसिंधु साहित्य कलामंच सिंधुदुर्ग यांचे ‘कायापालट’ (लेखक…

Read More

राष्ट्रीय काँग्रेसच्या डिजिटल सभासद नोंदणीसाठी आम. प्रणिती शिंदे कोकणात येणार

मालवण ता.२७-:* राष्ट्रीय काँग्रेसच्या डिजिटल सभासद नोंदणी राज्य प्रभारी, प्रदेश कार्याध्यक्षा आम. प्रणिती सुशीलकुमार शिंदे यांची युवक काँग्रेसचे सिंधुदुर्ग जिल्हा प्रवक्ते अरविंद मोंडकर यांनी सदिच्छा भेट घेतली. यावेळी कोकणातून जास्तीत जास्त सभासद नोंदणी होण्यासाठी आपण कोकणात येणार असल्याचे सांगतानाच उर्वरीत महाराष्ट्रा प्रमाणेच कोकण विभागातून जास्तीत जास्त नोंदणी करणाऱ्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा सत्कार करण्यात येणार असल्याचे…

Read More

वसंत साळकर यांचे निधन

मालवण ता.२७-:* मालवण कुंभारमाठ येथील रहिवासी आणि मालवण एसटी आगाराचे सेवानिवृत्त कर्मचारी वसंत यशवंत साळकर (वय ९२) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. वसंत साळकर हे उत्तम गायक व सामाजिक कार्यकर्ते होते. सनातन आश्रम करुणानंद स्वामी मठ गोवा या संस्थेच्या माध्यमातून अनेक सामाजिक उपक्रम त्यांनी राबविले होते. त्यांच्या पश्चात तीन मुलगे, चार मुली असा परिवार आहे.

Read More
You cannot copy content of this page