मराठी आपल्या संस्कारांची भाषा:डी.पी.तानावडे मराठी राजभाषादिनानिमित्त नगरवाचनालयात पुस्तकांचे प्रदर्शन

कणकवली ता.२७-:* मराठी आपल्या संस्कारांची भाषा आहे ग्लोबल युगात मराठी भाषेचा अधिकाधिक प्रसार होण्यासाठी मराठी माणसाने पुढाकार घ्यावा,असे आवाहन जिल्हा ग्रंथालयाचे उपाध्यक्ष डी पी तानावडे यांनी केले मराठी राजभाषा दिनानिमित्त कणकवली नगरवाचनालयात मराठी पुस्तकांचे प्रदर्शन आयोजित केले होते.या प्रदर्शनाचे उद्घाटन श्री तानावडे यांच्या हस्ते करण्यात आले.

या प्रसंगी ते बोलत होते. यावेळी बाचनालयाचे कार्यवाह हनिफ पिरखान,सदस्य पी जे कांबळे वैजयंती करंदीकर,डॉ विनायक करंदीकर, वाचनालयाच्या ग्रंथपाल जान्हवी जोशी, सह ग्रंथपाल राजन ठाकूर,लिपिक स्नेहल चव्हाण, अनिल मुसळे आदी उपस्थित होते. मराठी भाषेच्या उद्धारासाठी मराठी माणसाने भाषेचा प्रभावीपणे वापर करावा जेणकेरून मराठीचे महत्व वाढेल.मराठी आपल्या संस्कारांची भाषा ही आहे.

याचा सार्थ अभिमान आपल्याला असला पाहिजे.असे श्री.तानावडे यांनी सांगितले यावेळी जिल्हा वाचनालयाचा ग्रंथपाल कर्मचारी पुरस्कार वाचनालयाच्या जान्हवी जोशी यांना घोषित झाल्याबद्दल त्यांचे उपस्थित मान्यवरांनी सन्मान करत अभिनंदन केले . मराठी भाषेचे विख्यात साहित्यिक व कवी कुसुमाग्रज यांचा २७ फेब्रुवारी हा जन्म दिवस शासनाने मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला.यानिमित्ताने कणकवली नगरवाचनालयात कथा कादंबरी तसेच विविध मराठी पुस्तक प्रदर्शन आयोजित करण्यात आले.

You cannot copy content of this page