कनक रायडर्स सायकल क्लबतर्फे कणकवलीत सायकल स्वारी
कणकवली ता.२७-:* आरोग्यासाठी व पर्यावरणाच्या संवर्धनासाठी लयभारी असा संदेश ३०० हून अधिक सायकलपटूंनी दिला . कनक रायडर्स सायकल क्लबतर्फे इन्स्पायर सिंधुदुर्ग २०२२ सायकल रॅलीचे आयोजन केले .
या रॅलीचे उदघाटन आमदार वैभव नाईक व नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्या उपस्थित झाले . यावेळी सभापती मनोज रावराणे,उपसभापती मिलिंद मेस्त्री, पोलीस निरीक्षक सचिन हुंदळेकर,नगरसेवक अँड. विराज भोसले,ज्येष्ठ पत्रकार अशोक करंबेळकर,अँड.उमेश सावंत यांच्यासह कनक रायडर्स सायकल क्लब व इन्स्पायर सिंधुदुर्ग २०२२ चे आयोजक उपस्थित होते. पर्यावरण संवर्धन व आरोग्य सुदृढ राहण्याचा संदेश देण्यासाठी कनक रायडर्स सायकल क्लबतर्फे आयोजित केलेला सायकल रॅलीचा उपकम स्तुत्य आहे , असे गौरवोउद्गार समीर नलावडे यांनी केले.आमदार वैभव नाईक यांनी सायकल रॅलीच्या उपक्रम राबविलेल्या कनक रायडर्स सायकल क्लबचे कौतूक केले. त्यानंतर वैभव नाईक,अप्पर पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यासह प्रतिष्ठित नागरिक यांनी सायकल रॅलीत सहभाग घेतलाही सायकल रॅली २५,५०,१०० कि.मी.या तीन गटात ही रॅली आयोजित करण्यात आली होती.या रॅलीत सहभागी झालेल्या सायकलपटूंना आहे .टी-शर्ट,मेडल व प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.
