शिवसेना नेते संदेश पारकर यांनी घेतले श्री देव कुणकेश्वराचे दर्शन

कुणकेश्वर यात्रा नियोजनाचा घेतला आढावा

कणकवली ता.२७-:* शिवसेना नेते संदेश पारकर यांनी श्री देव कुणकेश्वराचे दर्शन घेऊन यात्रा नियोजनाचा आढावा घेतला. यावेळी कुणकेश्वर देवस्थान ट्रस्टी आणि ग्रामस्थांनी श्री.पारकर यांना यात्रा नियोजनाची माहिती दिली. तसेच यात्रा नियोजन संदर्भात काही मागण्या किंवा समस्या असतील तर खासदार विनायक राऊत आणि पालकमंत्री उदय सामंत यांच्यामार्फत त्या प्राधान्याने सोडविल्या जातील असे आश्वासन उपस्थितांना दिले.

यावेळी कुणकेश्वर देवस्थान उपाध्यक्ष दिनेश दुवाळी, माजी अध्यक्ष संजय वाळके, व्यवस्थापक रामदास तेजम, सदस्य दिपक घाडी, गणेश वाळके, अनंत वाळके, माजी सरपंच विश्वनाथ भुजबळ, अमोल लोके, प्रदिप मुणगेकर आदी उपस्थित आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

You cannot copy content of this page