उपाध्यक्ष प्रवीण आळवे, सचिवपदी नंदू वाळके
*⚡कणकवली ता.२७-:* कणकवली शहरातील सामाजिक सांस्कृतिक क्षेत्रात गेली अनेक वर्षे कार्यरत असणाऱ्या यंगस्टार मित्र मंडळ कणकवलीच्या अध्यक्षपदी सुरेंद्र उर्फ अण्णा कोदे यांची निवड करण्यात आली आहे. तर या मंडळाच्या उपाध्यक्षपदी प्रवीण आळवे यांची निवड करण्यात आली.
या मंडळाच्या नवीन कार्यकारिणीची निवड जाहीर करण्यात आली असून, कार्यकारिणीच्या सचिवपदी विठ्ठल उर्फ नंदू वाळके, सहसचिव व्यंकटेश सावंत, खजिनदार रूचिर ठाकूर, सहखजिनदार रुपेश केळुसकर, कार्यकारणी सदस्य – रुपेश वाळके, दयानंद उबाळे, परेश परब, विकास वाळके, रवी सावंत, सागर राणे, सचिन कांबळे, प्रशांत साटविलकर, संतोष सुतार, अमिता राणे, प्रियांका कोरगावकर यांची निवड करण्यात आली आहे.
