देवगड ता.२७-: मराठी साहित्याचा मानदंड कवी कुसुमाग्रज अर्थात वि. वा. शिरवाडकर यांचा जन्मदिवस अर्थातच मराठी राजभाषा दिन २७ फेब्रुवारी रोजी देवगड येथील बसस्थानकावर कवी कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून,दीपप्रज्वलनाने अभिवादन करून साजरा करण्यात आला.
या वेळी विभागीय अभियंता अक्षय केंकरे ,नियोजन वाणिज्य विभागीय अधिकारी राजन भोसले,विशेष कार्यकारी अधिकारी दयानंद मांगले,स्थानक प्रमुख श्रीकांत सैतवडेकर सहा. वाहतूक निरीक्षक लवू सरवदे,लेखाकार श्रीकांत शेळके,वहातूक नियंत्रक उमाकांत सोमण वरिष्ठ लिपिक दिलीप जाधव,नाना मोहिते हेड मेकॅनिक शुभम ओटवणेकर,अरुण धुरी चालक नामदेव कांबळे,उपस्थित होते. या वेळी दयानंद मांगले,अक्षय केंकरे,राजन भोसले,दिलीप जाधव,यांनी विचार मांडले.आभार श्रीकांत शेळके यानी मानले.
