देवगड महाराष्ट्र नवनिर्माण सेना देवगड तालुक्याच्या वतीने मराठी राजभाषा दिन अर्थात कुसुमाग्रज वि.वा. शिरवाडकर यांचा जन्म दिवसाचे औचित्य साधून “आजपासून प्रतिज्ञा करू आपली स्वाक्षरी मराठीतच करू”या मोहिमेचा शुभारंभ देवगड येथील सामाजिक कार्यकर्ते नगरसेवक,विशेष कार्यकारी अधिकारी,रिक्शा व्यावसायिक व्यापारी यांच्या स्वाक्षरीने केला.
या वेळी, उल्हास मणचेकर,नगरसेवक संतोष तारी, अनिल खडपकर,दयानंद मांगले,संदीप जाधव,आनंद भाटकर ,मनसे तालुका अध्यक्ष चंदन मेस्त्री,उपाध्यक्ष महेश नलावडे,सचिव जगदीश जाधव,विभाग अध्यक्ष नंदकिशोर हडकर,शहर अध्यक्ष सचिन राणे उपस्थित होते.
