मालवण ता.२७-:महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या विभागाच्या वतीने आयोजित ६० व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेची प्राथमिक फेरी मालवण केंद्रावर मामा वरेरकर नाट्यगृह येथे होत आहे. २ ते ११ मार्च या कालावधीत सायंकाळी ७ वाजता दहा नाटकांचा आस्वाद नाट्यप्रेमींना घेता येणार आहे.
यामध्ये दि. २ मार्च रोजी अक्षरसिंधु साहित्य कलामंच सिंधुदुर्ग यांचे ‘कायापालट’ (लेखक संभाजी सावंत, दिग्दर्शक सुहास वरूणकर), ३ रोजी बाबा वर्दम थिएटर्स कुडाळ यांचे ‘गांधी विरुद्ध सावरकर’ (लेखक पुरुषोत्तम बेर्डे, दिग्दर्शक केदार सामंत), ४ रोजी जीवनदायी विकास संस्था वेंगुर्ला यांचे ‘बोगनवेल’ (लेखक-दिग्दर्शक प्रसाद खानोलकर), ५ रोजी क्षितिज इव्हेंट सावंतवाडी यांचे ‘तुका अभंग अभंग’ (लेखक विष्णू सुर्या वाघ, दिग्दर्शक प्रवीण मांजरेकर), ६ रोजी माझा वेंगुर्ला वेंगुर्ला यांचे ‘लोककथा – ७८’ (लेखक रत्नाकर मतकरी, दिग्दर्शक प्रकाश हळदणकर, ७ रोजी नागरिक बहुउद्देशीय सेवा प्रतिष्ठान नेरूर (कुडाळ) यांचे ‘चांडाळ चौकडी’ (लेखक भास्कर गावडे, दिग्दर्शक देवेंद्र गावडे), ८ रोजी साई कला क्रीडा मंच पिंगुळी यांचे ‘बाकी शून्य’ (लेखक – दिग्दर्शक केदार देसाई), ९ रोजी श्री ज्ञानेश्वर कला संस्कृती क्रीडा मंडळ नेरूर सायचेटेंब यांचे ‘डावी बाजू’ (लेखक – दिग्दर्शक साईनाथ नेरुरकर), १० रोजी सिद्धांत फाउंडेशन सिंधुदुर्ग यांचे ‘महाशून्य’ (लेखक राजेंद्र पोळ, दिग्दर्शक स्वानंद सामंत), ११ रोजी स्वराध्या फाउंडेशन, मालवण यांचे ‘लग गये तेरे प्यार मे’ (लेखक अमोल देसाई, दिग्दर्शक रघुनाथ कदम) ही नाटके सादर होणार आहेत. नाट्यरसिकांसाठी नाममात्र १५ व १० रुपये तिकीट दर ठेवण्यात आले आहेत.
