Headlines

Global Maharashtra Breaking News

मठ श्री देवी सातेरीचातृतिय वर्धापन दिन उद्यापासून…

⚡वेंगुर्ला ता.२७-: वेंगुर्ला तालुक्यातील मठश्री देवी सातेरी आणि परिवार देवतांचा पुनः प्रतिष्ठापना कार्यक्रमाचा तृतीय वर्धापन दिन कार्यक्रम मंगळवार दि.२८ एप्रिल रोजी आयोजित करण्यात आला आहे. मंगळवार दि. २८ एप्रिल रोजी सकाळी ९.३० वा. श्री देव स्वयंभू पालखी तसेच तरंगदेवांचे आगमन,सकाळी १० वा. गणेश पूजन, समस्त देवदेवतांना आवाहन,सकाळी ११ वा. समस्त मानकरी, गावरयत आणि यजमान यांच्या…

Read Full News

वेंगुर्ला श्री देवी भराडी देवीचा वर्धापन दिन सोहळा उद्या…

⚡वेंगुर्ला ता.२७-: वेंगुर्ला तालुक्यातील श्री देवी भराडी मंदिर वेंगुर्लाश्री देवी भराडी देवीचा वर्धापन दिन सोहळा मंगळवार दि. 28 एप्रिल रोजी संपन्न होणार आहे. यानिमित्त सकाळी ८ वा. श्री देवी भराडीची विधियुक्त पाद्य पूजा लघुरुद्र व अभिषेक,सकाळी ९ वा.सुवासिनींसाठी कुंकूमार्चन,सकाळी १०.३० वा. सत्यनारायण महापूजा,दुपारी १२.३० वा. महाआरती व महाप्रसाद, सायंकाळी४ वा. गोवा भजन मंडळ यांचे संगीत…

Read Full News

कणकवलीत 1 मे रोजी जिल्हास्तरीय भजन स्पर्धा…!

श्री स्वयंभू मंदिरात 12 व्या वर्धापनदिनानिमित्त आयोजन…! ⚡कणकवली ता.२७-:शहराचे ग्रामदैवत श्री देव स्वयंभू रवळनाथ पंचायतन देवस्थानच्या 12 व्या वर्धापन दिनानिमित्त शुक्रवार 1 मे रोजी सकाळ पासून विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच सायंकाळी 5.30 वाजता निमंत्रित भजन मंडळांची जिल्हास्तरीय भजन स्पर्धा आयोजित केली आहे.1 मे रोजी सकाळी 9 वाजता धार्मिक विधी,…

Read Full News

कासर्डे येथील आनंद नगरमध्ये मटका जुगारावर पोलिसांचा छापा…

⚡कणकवली ता.२७-:कणकवली तालुक्यातील कासर्डे येथील आनंद नगर परिसरात बेकायदेशीररीत्या मटका जुगार खेळवणाऱ्या एका इसमावर पोलिसांनी कारवाई केली आहे. या छाप्यात पोलिसांनी रोख रकमेसह ८,७२० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून एकावर गुन्हा दाखल केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आनंद नगर (कासर्डे) येथे संशयित आरोपी अजित रामचंद्र नकाशे (वय ४९, रा. कासर्डे) हा लोकांकडून पैसे स्वीकारून ‘मुंबई मटका’…

Read Full News

आजीच्याच घरावर दरोडा टाकणाऱ्या नातवासह साथीदाराना दोन दिवसांची पोलीस कोठडी…

⚡कणकवली ता.२७-:तालुक्यातील ओटव – ओटववाडी येथे वृद्ध महिलेला धमकावून त्यांच्या गळ्यातील सोन्याच्या चेनची जबरी चोरी करणाऱ्या नातवासह त्याच्या साथीदाराला स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने (LCB) मीरा-भाईंदर येथून ताब्यात घेतले होते. या प्रकरणातील दोन्ही आरोपींना न्यायालयाने २८ एप्रिलपर्यंत दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. मंगळवारी (२२ एप्रिल) सकाळी ११:३० च्या सुमारास सुवर्णा नारायण रावले (वय ६६) या…

Read Full News

झाराप सरपंचांवरील अविश्वास ठराव २० मतांनी मंजूर…

कुडाळ : झारापच्या सरपंच दक्षता मेस्त्री यांच्या विरुद्धचा ठराव आज झालेल्या ग्रामसभेत २० मतांनी मंजूर झाला. ग्रामसभेत एकूण ७३४ मतदान झाले. त्यापैकी ३६६ मते अविश्वासाच्या बाजूने, ३४६ विरोधात, तर २२ मते अवैध ठरली. शेवटच्या क्षणापर्यंत ताणलेली ही चुरशीची लढत अखेर सरपंचांच्या पराभवाने संपली. यापूर्वी ग्रामपंचायत सदस्यांमध्ये ८ विरुद्ध २ अशा मतांनी ठराव मंजूर झाला होता,…

Read Full News

माजगाव कासरवाडा येथे झाडाच्या फांद्यांमुळे महामार्गावर वाहतूक विस्कळीत…

तात्काळ कारवाई करा : वाहनधारकांमधून होत आहे मागणी… ⚡सावंतवाडी ता.२७- जुना मुंबई-गोवा महामार्गावर माजगाव कासरवाडा येथे रस्त्याच्या कडेला असलेल्या एका मोठ्या झाडाच्या फांद्या अचानक रस्त्याच्या मधोमध आल्याने वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण झाला आहे. यामुळे या मार्गावरील वाहनचालकांना कमालीचा त्रास सहन करावा लागत असून वनविभागाने याची तात्काळ दखल घ्यावी, अशी मागणी जोर धरत आहे. माजगाव कासरवाडा…

Read Full News

अन्नपूर्णा कोरगावकर यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमांनी साजरा…!

⚡सावंतवाडी ता.२७-: माजी उपनगराध्यक्ष अन्नपूर्णा कोरगावकर तथा अन्नपूर्णा सेवा फाउंडेशनच्या अध्यक्षा यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी रोनापाल येथील छात्रालयात अत्यावश्यक वस्तूंचे वाटप करून मुलांसोबत वाढदिवस साजरा करण्यात आला. तसेच इन्सुली शाळा क्रमांक पाच येथे विद्यार्थ्यांसाठी फॅन व चटई देण्यात आल्या. सावंतवाडी येथील निवारा केंद्रात गरजेच्या वस्तूंचे वाटप करण्यात आले.याशिवाय…

Read Full News

लोकांचे प्रश्न सुटेल पाहिजेत…

आमदार निलेश राणे :तब्बल ७ वर्षांनी झाली कुडाळची आमसभा,पाच तास चाललेल्या आमसभेत १२५ निवेदने.. कुडाळ : लोंकांचे प्रश्न सुटले पाहिजेत. त्यासाठी प्रशासनाने काम केले पाहिजे. प्रशासन कामाला लागले कि लोकप्रतिनिधींचे काम सोपे होते. त्यामुळे या आमसभेत अधिकाऱ्यांनी दिलेली उत्तरे लक्षात ठेवावीत. त्याचा पाठपुरावा मी करत राहणार. असे स्पष्ट प्रतिपादन आमदार निलेश राणे यांनी केले. तब्बल…

Read Full News

दाणोली येथे मालवाहतूक ट्रक पलटी…

वाहतूक विस्कळीत: सायंकाळची घटना.. ⚡सावंतवाडी ता.२७-: सावंतवाडी-आंबोली मार्गावर दाणोली येथे मालवाहतूक करणारा ट्रक पलटी झाल्याची घटना आज सायंकाळच्या सुमारास घडली. या अपघातामुळे काही काळासाठी वाहतूक विस्कळीत झाली.अपघाताची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली. दरम्यान, वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत असून पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली आहे.सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी…

Read Full News

You cannot copy content of this page