⚡सावंतवाडी ता.२७-: माजी उपनगराध्यक्ष अन्नपूर्णा कोरगावकर तथा अन्नपूर्णा सेवा फाउंडेशनच्या अध्यक्षा यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून उत्साहात साजरा करण्यात आला.
यावेळी रोनापाल येथील छात्रालयात अत्यावश्यक वस्तूंचे वाटप करून मुलांसोबत वाढदिवस साजरा करण्यात आला. तसेच इन्सुली शाळा क्रमांक पाच येथे विद्यार्थ्यांसाठी फॅन व चटई देण्यात आल्या. सावंतवाडी येथील निवारा केंद्रात गरजेच्या वस्तूंचे वाटप करण्यात आले.याशिवाय उपजिल्हा रुग्णालयात रुग्णांना चादरी व फळांचे वितरण करण्यात आले. मळगाव येथील वृद्धाश्रमातही ज्येष्ठ नागरिकांना आवश्यक वस्तू देऊन त्यांच्यासमवेत वाढदिवस साजरा करण्यात आला.
या सर्व उपक्रमांमध्ये त्यांची मुलगी युवा उद्योजिका ऐश्वर्या शेट कोरगावकर, मुलगा युवा उद्योजक अखिलेश कोरगावकर तसेच अन्नपूर्णा सेवा फाउंडेशनचे सर्व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
