दाणोली येथे मालवाहतूक ट्रक पलटी…

वाहतूक विस्कळीत: सायंकाळची घटना..

⚡सावंतवाडी ता.२७-: सावंतवाडी-आंबोली मार्गावर दाणोली येथे मालवाहतूक करणारा ट्रक पलटी झाल्याची घटना आज सायंकाळच्या सुमारास घडली. या अपघातामुळे काही काळासाठी वाहतूक विस्कळीत झाली.
अपघाताची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली.

दरम्यान, वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत असून पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली आहे.सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती समोर आलेली नाही. मात्र ट्रकच्या पलटीमुळे रस्त्यावर काही काळ वाहतुकीचा खोळंबा झाला. या घटनेचा अधिक तपास पोलीस करत आहेत.

You cannot copy content of this page