वेंगुर्ला श्री देवी भराडी देवीचा वर्धापन दिन सोहळा उद्या…

⚡वेंगुर्ला ता.२७-: वेंगुर्ला तालुक्यातील श्री देवी भराडी मंदिर वेंगुर्ला
श्री देवी भराडी देवीचा वर्धापन दिन सोहळा मंगळवार दि. 28 एप्रिल रोजी संपन्न होणार आहे. यानिमित्त सकाळी ८ वा. श्री देवी भराडीची विधियुक्त पाद्य पूजा लघुरुद्र व अभिषेक,
सकाळी ९ वा.सुवासिनींसाठी कुंकूमार्चन,सकाळी १०.३० वा. सत्यनारायण महापूजा,
दुपारी १२.३० वा. महाआरती व महाप्रसाद, सायंकाळी
४ वा. गोवा भजन मंडळ यांचे संगीत भजन, रात्रौ ७.३० वा. नितीन आसयेकर प्रस्तुत
श्री देवी भूमिका दशावतार लोककला नाट्य मंडळ
मळगांव, ता.सावंतवाडी यांचा
भव्य-दिव्य असा राम भक्तीवर आधारित दर्जेदार पौराणिक अध्यात्मिक ट्रिकसीन युक्त ‘भक्त शिरोमणी संत कबीर’ हा
नाट्यप्रयोग सादर होणार आहे. भाविकांनी सर्व धार्मिक कार्यक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री देवी भराडी देवस्थान, वेंगुर्ला यांच्यामार्फत करण्यात आले आहे.

You cannot copy content of this page