मठ श्री देवी सातेरीचातृतिय वर्धापन दिन उद्यापासून…

⚡वेंगुर्ला ता.२७-: वेंगुर्ला तालुक्यातील मठ
श्री देवी सातेरी आणि परिवार देवतांचा पुनः प्रतिष्ठापना कार्यक्रमाचा तृतीय वर्धापन दिन कार्यक्रम मंगळवार दि.२८ एप्रिल रोजी आयोजित करण्यात आला आहे. मंगळवार दि. २८ एप्रिल रोजी सकाळी ९.३० वा. श्री देव स्वयंभू पालखी तसेच तरंगदेवांचे आगमन,
सकाळी १० वा. गणेश पूजन, समस्त देवदेवतांना आवाहन,
सकाळी ११ वा. समस्त मानकरी, गावरयत आणि यजमान यांच्या उपस्थितीत पुण्याहवाचन, आचार्यवरण देवता स्थापना, सप्तशती पाठवाचन, दुपारी २ वा. समस्त देवतांना नैवेद्य, आरती, सायंकाळी ६.३० वा.
शालेय मुलांचे मनोरंजनात्मक सांस्कृतिक कार्यक्रम,
रात्री ८ वा. महिलांसाठी खेळ व आकर्षक बक्षिसे,
रात्री ९ वा. कै. आना मेस्त्री ग्रुप नेरूर यांचा पारंपरिक शिमगोत्सव, लोककला, चित्ररथ देखावे सादर होणार आहेत. बुधवार दि. २९ एप्रिल रोजी सकाळी १० वा. आवाहित देवता पूजन,
सकाळी १०.३० वा. सप्तशती पाठ हवन, बलिदान, सकाळी ११.३० वा. गावातील सौभाग्यवतींच्या हस्ते श्री देवी चरणी कुंकुमार्जन विधी कन्यापूजन, दुपारी १.३० वा. समस्त देवतांना नैवेद्य, महाआरती, दुपारी २ वा. महाप्रसाद, सायंकाळी ६ वा. महिलांद्वारे कार्यक्रम,
सायंकाळी ७ वा. सुश्राव्य वारकरी भजन, रात्रौ १० वा. श्रींची पालखी प्रदक्षिणा,
रात्रौ १०.३० वा. गौतमेश्वर दशावतार नाट्यमंडळाचा नाट्यप्रयोग सादर होणार आहे. भाविकांनी व ग्रामस्थांनी सर्व धार्मिक कार्यक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन
श्री देव स्वयंभू (वगैरे) देवस्थान स्थानिक उप समिती, मठ व ग्रामस्थ यांच्यामार्फत करण्यात आले आहे.

You cannot copy content of this page