⚡कुडाळ ता.२७-: पिंगुळी – पाट रस्त्यावर पिंगुळी म्हापसेकर तिठा जवळच्या भूपकरवाडी येथे रस्त्यालगत उभ्या असलेल्या बोलेरो पीक अप जीपला समोरून येणाऱ्या अल्टो कारची धडक बसून अपघात झाला. हा अपघात आज सोमवारी सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास झाला. उपलब्ध माहितीनुसार, पिंगुळी भूपकरवाडी येथे रस्त्यालगत बोलेरी पिक अप जीप उभी करून ठेवण्यात आली होती. समोरून पिंगुळी म्हापसेकरतिठ्याच्या दिशेने येणारी अल्टो कार रस्त्याच्या पलिकडे जाऊन तीची बोलेरोला जोराची धडक बसली. अल्टो कार मधील दोघांना किरकोळ दुखापत झाल्याचे समजते. अपघातात दोन्ही गाड्यांचे मोठे नुकसान झाले.
पिंगुळी पाट रस्यावर बोलेरो पिकअप आणि कार मध्ये अपघात…
