साभिनय सवेश नाट्यगीत स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद
*⚡मालवण ता.२४-:* मालवण येथील अष्टपैलू कलानिकेतन तर्फे आयोजित नटवर्य राम गणेश गडकरी स्मृतिप्रित्यर्थ साभिनय सवेश नाट्यगीत स्पर्धा २०२२ मालवण भरड येथील दत्त मंदिरच्या प्रांगणात संपन्न झाली. सलग अकराव्या वर्षी आयोजित केलेल्या या स्पर्धेत बाल, कुमार व खुल्या गटातून स्पर्धकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. यावेळी विविध रंगभूषा साकारत स्पर्धकांनी सवेश सादर केलेल्या विविध नाट्यगीतांनी रसिकांना मंत्रमुग्ध केले….
