भांडुप येथे गाबीत समाजासाठी वधू- वर परिचय मेळावा

मालवण ता.२४-:* मराठा क्षत्रिय विद्यावर्धक मंडळ, मुंबई तर्फे रविवार दि. १ मे रोजी सकाळी १० ते दुपारी ३ यावेळेत गाबीत समाजासाठी वधू- वर परिचय चर्चा मेळावा म.क्ष.वी.मं. छ्त्रपती शिवाजी महाराज तलावाजवळ, टेंबिपाडा रोड,भांडुप पश्चिम मुंबई ४०००७८ येथे आयोजित केला आहे. या कार्यक्रमात विवाहोत्सुक उमेदवार आणि पालकांसाठी स्वतंत्र व्यवस्था असणार असून उमेदवारांची उपस्थिती, त्यांच्या स्थळ विषयक माहिती, परिचय एलईडी स्क्रीनवर प्रकाशित केली जाणार आहे.

सकाळपासून प्रास्तविक, उमेदवार माहिती प्रसारण, ओळख, दुपारी निवडलेल्या स्थळाशी प्रत्यक्ष भेट-मुलाखत-चर्चासत्र-आभार सांगता अशी कार्यक्रमाची रूपरेषा आहे. या मेळाव्यासाठी उमेदवारांसाठी नाव नोंदणी प्रवेश फी व पालक प्रवेश फी आहे. या कार्यक्रमात उमेदवारांनी एलईडीस्क्रीनवर प्रसारणासाठी स्वपरिचय, रहाणीमान, कुटुंब, आवड-निवड यासह आकर्षक फोटो-छायाचित्र इत्यादी माहितीचा व्हिडीओ सादर करावा.

आपल्या माहितीत पत्ता-संपर्क क्रमांक सादर करु नये. सदर व्हिडीओ क्लीप तपासणीसाठी दि. २७ एप्रिल पर्यंत आपली नोंद फोनवर अगर पुढील mkvvadhuvar@gmail.com या ई-मेलवर सादर करावा. अधिक माहितीसाठी डॉ. विणा शेलटकर ९७६९३८९९९३, हरिश्चंद्र ना. वस्त ९८६९२८९८०२, सुरेश बापर्डेकर ९८६९१३२८८२, चंद्रहास केळुस्कर ९७६९६९०२५१ यांच्याशी संपर्क साधावा. गाबीत समाजातील जास्तीत जास्त वधू वर यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन संस्थेचे विश्वस्त केशव चोपडेकर, गणेश मित्रा यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे केले आहे.

You cannot copy content of this page