आडेली सोसासयटी चेअरमनपदी प्रकाश गडेकर बिनविरोध

वेंगुर्ला प्रतिनिधी- आडेली येथील श्री सोमेश्वर प्रासादिक विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटीच्या चेअरमनपदी प्रकाश महादेव गडेकर व व्हाईस चेअरमनपदी आत्माराम रामचंद्र धर्णे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

आडेली श्री सोमेश्वर पासादिक विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटीच्या ९ एप्रिल रोजी झालेल्या पंचवार्षिक निवडणुकीत श्री देव सोमेश्वर, सातेरी, रायकर सहकार समृद्धी गाव पॅनलने श्री देव सोमेश्वर सातेरी गाव विकास सहकार पॅनल वर एकहाती विजय मिळवित आडेली सोसायटीवर वर्चस्व प्रस्थापित केले होते.

त्यानंतर २३ एप्रिल रोजी निवडणूक निर्णय अधिकारी एस.एस.कावले यांच्या उपस्थितीत सोसायटीच्या सभागृहात ही निवड प्रक्रिया पार पडली. यावेळी अशोक गावडे, दिलीप गावडे, विश्राम कोंडसकर, सुरेश पाटकर, यशवंत ठाकूर, गणेश वाघे, प्राची धर्णे, सुवर्णा केळुसकर, फक्रो आडेलकर, गंगाधर गोवेकर, दर्शन गवळी आदी सदस्य उपस्थित होते.

प्रकाश गडेकर व आत्माराम रामचंद्र धर्णे यांची बिनविरोध निवड जाहीर होताच शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते, तालुकाप्रमुख यशवंत उर्फ बाळू परब, सामाजिक कार्यकर्ते सचिन गडेकर, सरपंच प्राजक्ता मुंडये यांच्यासह नितीन मांजरेकर, अजित राऊळ, सुनिल मोरजकर, देवा कांबळी, चंद्रकांत गडेकर, नाना धर्णे, भारत धर्णे यांच्यासह अन्य ग्रामस्थांनी त्यांचे अभिनंदन केले.

You cannot copy content of this page