*⚡मालवण ता.२४-:* मालवण येथील गाबीत समाज नागरी सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी विष्णू उर्फ आप्पा पराडकर यांची निवड झाल्याबद्दल मालवण तालुका शासकीय निमशासकीय कर्मचारी ग्राहक सहकारी संस्था संचलित मालवणी बझारच्या संचालक मंडळाच्या पराडकर यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी उपस्थितांनी पराडकर यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी मालवणी बझारचे उपाध्यक्ष पी. एस. बागवे, संचालक मंडळ सदस्य पी. एल. मोहिते, एस. डी. तळवडेकर, एम. आर. सोनवडेकर, एल. एस. शिंदोळकर, के. बी. गावकर, एम. व्ही. प्रभुगावकर, एस. एम. गवंडी, व्ही. एस. सातार्डेकर, श्रीमती ए. एम. हर्डीकर, संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी. व्ही. परब यांसह कर्मचारी उपस्थित होते.
