*⚡मालवण ता.२४-:* मालवण येथील अष्टपैलू कलानिकेतन तर्फे आयोजित नटवर्य राम गणेश गडकरी स्मृतिप्रित्यर्थ साभिनय सवेश नाट्यगीत स्पर्धा २०२२ मालवण भरड येथील दत्त मंदिरच्या प्रांगणात संपन्न झाली. सलग अकराव्या वर्षी आयोजित केलेल्या या स्पर्धेत बाल, कुमार व खुल्या गटातून स्पर्धकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. यावेळी विविध रंगभूषा साकारत स्पर्धकांनी सवेश सादर केलेल्या विविध नाट्यगीतांनी रसिकांना मंत्रमुग्ध केले. या स्पर्धेचे उद्घाटन ज्येष्ठ नाट्यदिग्दर्शक रघुनाथ भास्कर कदम यांच्या हस्ते झाले.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. उज्ज्वला सामंत, कलानिकेतनचे अध्यक्ष भालचंद्र केळुसकर, उपाध्यक्ष सुनील परुळेकर, सचिव सुधीर कुर्ले, सुधीर धुरी, विलास देऊलकर, अभय कदम, बाळा आचरेकर, बाळू काजरेकर, हेमंत आचरेकर, कुणाल वराडकर, प्रभूदास आजगावकर आदी उपस्थित होते. अष्टपैलू कलनिकेतन तर्फे यावर्षीचा जीवन गौरव पुरस्कार ज्येष्ठ नाट्यकलावंत रामभाऊ लक्ष्मण मयेकर यांना जाहीर करून तो संस्थाध्यक्ष भालचंद्र केळुसकर यांच्या हस्ते यावेळी प्रदान करण्यात आला. मानपत्र, शाल, श्रीफळ व पाच हजार रुपयांची थैली देऊन मयेकर यांचा गौरव अष्टपैलू कलानितेनतर्फे करण्यात आला. मयेकर यांनी संस्थेचे आभार मानत कलेच्या प्रेमाखातर आतापर्यंत आपण काम केल्याचे सांगितले.
स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे:- बालगट – प्रथम- कु. गीता सोपान गवंडे, द्वितीय – कु. प्राजक्ता अभय ठाकूरदेसाई, तृतीय – कु. गौरी राजन वस्त, उत्तेजनार्थ प्रथम – कु. दुर्वांक हृदयनाथ गावडे, उत्तेजनार्थ द्वितीय – कु.भूमी आशिष नाबर, उत्तेजनार्थ तृतीय – कु. मृण्मयी सदाशिव आरोलकर. कुमार गट- प्रथम – कु. सानिका संदिप गोखले,,द्वितीय – कु.गरिमा विद्याभूषण काजरेकर, तृतीय – कु.चैताली राजेंद्र मेस्त्री, उत्तेजनार्थ प्रथम – कु.गायत्री सदाशिव आरोलकर, उत्तेजनार्थ द्वितीय – भूमिका विजय यादव, खुला गट- प्रथम – कु. सर्वेश कृष्णा राऊळ, द्वितीय – कु. संपदा सदानंद खोबरेकर, तृतीय – कु. आस्था राजेंद्र आचरेकर, उत्तेजनार्थ प्रथम – कु. मिनाक्षी मच्छिंद्रनाथ गोसावी उत्तेजनार्थ द्वितीय – कु. सौम्या सुधीर कुर्ले, उत्तेजनार्थ तृतीय – सौ. रुचिरा रुपेश धुरी. स्पर्धेसाठी ऑर्गन साथ- भालचंद्र केळुसकर तबला- सुधीर गोसावी, पंकज पाटील, वेशभूषा- सुहास माळकर, ध्वनी- बाळा आचरेकर यांनी संगीत साथ दिली. प्रास्ताविक भालचंद्र केळुसकर यांनी केले. सूत्रसंचालन विनोद सातार्डेकर यांनी केले.
