भाजपचा झाला दारुण पराभव
*कणकवली ता.२४-:* भिरवंडे विविध कार्यकारी सहकारी सोसायटी निवडणुकीत शिवसेनेने पुन्हा आपले वर्चस्व स्थापन करत शिवसेना पुरस्कृत शेतकरी समृद्धी पॅनल विजय झाला आहे. शिवसेना नेते सतीश सावंत यांनी आपला गड राखत भाजपला पराभवाची धूळ चारली आहे. शिवसेना व भाजप या दोन्ही पक्षांमध्ये 13 पैकी 10 जागांसाठी मोठी रस्सीखेच सुरू होती. शिवसेनेच्या शेतकरी समृद्धी पॅनल तर भाजपच्या दिर्बा रामेश्वर पॅनलमध्ये ही निवडणूक झाली होती.माजी जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत व माजी जिल्हा परिषद अध्यक्ष गोट्या सावंत या दोघांनीही ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती पण शिवसेना नेते सतीश सावंत यांनी सोसायटीवर शिवसेनेची सत्ता स्थापन केल्याने पुन्हा एकदा सतीश सावंत निवडणुकीत किंगमेकर ठरले आहेत.
शिवसेना पुरस्कृत शेतकरी समृद्धी पॅनलचे विजयी उमेदवार पुढीलप्रमाणे आहेत. प्रकाश घाडीगांवकर (260), बेनी डिसोजा (254),अरविंद सावंत (254), चंद्रशेखर सावंत (257), तुषार सावंत (253),प्रदिप सावंत (250), मंगेश सावंत (252), रमेश सावंत (249), दिपा सावंत (262), स्मिता सावंत 257 यांना मते मिळाली. तर भाजपचे अर्जून कदम (77), बद्रीनाथ सावंत (95), महादेव सावंत (103),मोहन सावंत (90), रविकांत सावंत (89), विठ्ठल सावंत (89), सतिश शं सावंत (90),श्रीकांत सावंत (100),उर्मिला सावंत (104), नम्रता सावंत (104) यांना मते मिळाली.
