चालत्या गाडीचा टायर फुटल्याने गाडी झाली पलटी

कसाल येथील घटना ;प्रवाशांना किरकोळ दुखापत

*⚡ओरोस ता.२४-:* मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील कसाल पुलाजवळ चालत्या गाडीचा टायर फुटून अपघात झाला. टायर फुटल्याने गाडी रस्त्यावर पलटी झाली. सुदैवाने जीवितहानी झाली नाही. गाडीतील एका प्रवाशाला किरकोळ दुखापत झाली. त्यांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रविवारी दुपारी १२ वाजून ५० मिनिटांनी ही घटना घडली.

चालक प्रकाश धोंडू सावंत, वय 59, कांदिवली मुंबई हे कांदिवली ते कुडाळ असे Ritz एमएच ०२, बीएम ३२३० ही गाडी घेऊन जात असता गाडीचा डाव्या बाजूचा पुढील टायर फुटून गाडी रस्त्यावर पलटी होऊन अपघात घडला. त्यात गाडी मधील प्रवाशी अंकिता अनिल सुर्वे, कांदिवली मुंबई यांना किरकोळ दुखापत झाली. ही घटना ओसरगाव येथील महामार्ग पोलीस केंद्राला समजताच त्यांनी घटनास्थळी धाव घेत प्रथम जखमी अंकिता सुर्वे यांना 108 अंबुलन्सद्वारे उपचाराकरिता जिल्हा रुग्णालय सिंधुदुर्ग येथे दाखल केले. त्यानंतर अपघात ग्रस्त वाहन बाजूला करून वाहतूक सुरळीत केली. अपघातानंतर अवघ्या पाच मिनिटात महामार्ग पोलीस मदतीसाठी घटनास्थळी पोहोचले. याबाबतची माहिती महामार्ग पोलीस केंद्राचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अरुण जाधव यांनी दिली.

You cannot copy content of this page