Headlines

Global Maharashtra Breaking News

सिंधुदुर्गातील आठही तालुक्यांत दुष्काळाची ‘प्रथम कळ’ लागू…

पालकमंत्री नितेश राणे यांचे जिल्हा प्रशासनाला पंचनामे विहित मुदतीत पूर्ण करण्याचे निर्देश:जिल्ह्यात जमीन महसूलात सूट, पीक कर्ज पुनर्गठनासह विविध सवलती.. ⚡सिंधुदुर्ग,दि.२६-: खरीप हंगाम २०२६ मधील पर्जन्यमानातील तूट व अन्य घटकांच्या आधारे राज्यातील २६५ तालुक्यांमध्ये दुष्काळी परिस्थिती असल्याचे निदर्शनास आले असून, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी, दोडामार्ग, कणकवली, कुडाळ, वैभववाडी, मालवण, देवगड आणि वेंगुर्ला या सर्व आठही तालुक्यांमध्ये…

Read Full News

बांदा पोलिस ठाणे मैदानावर २ ऑक्टोबरला रंगणार डबलबारी भजनाचा जंगी सामना…

⚡बांदा ता.२६-: बांदा पोलीसठाण्यातील श्री देव पाटेश्वर मंदिरातील गणेशोत्सवात सालाबादप्रमाणे यंदाही डबलबारी भजनाचा जंगी सामना आयोजित करण्यात आला आहे. शुक्रवार दिनांक २ ऑक्टोबर रोजी रात्री ८ वाजता बांदा पोलिस ठाणे मैदानावर हा भजनाचा सामना रंगणार आहे.या सामन्यात कुडाळ येथील हनुमान प्रसादिक भजन मंडळाचे बुवा गुंडू सावंत आणि कुडाळभरणी येथील श्री लिंगेश्वर प्रसादिक भजन मंडळाचे बुवा…

Read Full News

शक्तिपीठ महामार्गासाठी झोळंबे, असनिये व बांद्यात जनसुनावणी

२९ सप्टेंबरला झोळंबे व असनियेत, ३० सप्टेंबरला बांद्यात आयोजन बांदा/सकाळ वृत्तसेवाशक्तिपीठ महामार्गाच्या प्रस्तावित मार्गासंदर्भात स्थानिक नागरिक, शेतकरी व संबंधित जमीनधारकांच्या हरकती, सूचना आणि मते जाणून घेण्यासाठी जनसुनावणीचे आयोजन करण्यात आले आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील झोळंबे, असनिये आणि बांदा येथे या जनसुनावणी होणार असून, संबंधित गावांतील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपली भूमिका मांडावी, असे आवाहन करण्यात…

Read Full News

गोवा बनावटीच्या दारूचा ३७.८० लाखांचा साठा जप्त…

आयशर वाहनासह दोघांना अटक; सावंतवाडी पोलिसांची सातोळी बावळट येथे कारवाई.. ⚡सावंतवाडी ता.२६-: गोवा बनावटीची दारू महाराष्ट्रात बेकायदेशीररीत्या वाहतूक करणाऱ्या दोघांना सावंतवाडी पोलिसांनी अटक केली असून, त्यांच्या ताब्यातून सुमारे २२ लाख ८० हजार रुपये किमतीची दारू आणि १५ लाख रुपये किमतीचे आयशर वाहन, असा एकूण ३७ लाख ८० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही…

Read Full News

शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचणार पालकमंत्री नितेश राणे…

रविवारी २७ रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर:शेतकऱ्यांच्या अडचणी आणि पिकांच्या नुकसानीची प्रत्यक्ष करणार पाहणी,जिल्हाधिकारी कार्यालयात अधिकाऱ्यांची घेणार आढावा बैठक.. ⚡कणकवली ता.२६-: राज्यातील दुष्काळसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे हे रविवारी, २७ सप्टेंबर रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. या दौऱ्यात ते जिल्ह्यातील भात शेतीच्या परिस्थितीची तसेच नुकसान झालेल्या…

Read Full News

‘ओंकार’ हत्तीच्या वावरामुळे बांद्यात भीतीचे वातावरण…

RRT पथकाच्या हुसकावणीच्या पद्धतीची चौकशी करण्याची मागणी:वन अधिकाऱ्यांना ग्रामस्थांचे निवेदन.. ⚡कुडाळ ता.२६-: बांदा शहर व परिसरात वावरत असलेल्या ‘ओंकार’ हत्तीमुळे मानव-हत्ती संघर्षाची परिस्थिती निर्माण झाली असून, नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी तातडीने प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी बांदा परिसरातील नागरिक व शेतकऱ्यांनी वन विभागाकडे निवेदनाद्वारे केली आहे.‘ओंकार’ हत्तीच्या वावरामुळे शेतीचे नुकसान होत असून, स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे….

Read Full News

तळवडे येथे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धांना प्रारंभ…

⚡सावंतवाडी ता.२६-: क्रीडा व युवक सेवा संचालनालय पुणे व जिल्हा क्रीडा कार्यालय, तसेच तालुका व्यवस्थापन समिती, सावंतवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित तालुकास्तरीय १७ वर्षे वयोगटातील मुला मुलींच्या कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन तळवडे येथील शिक्षण प्रसारक मंडळ तळवडे संचलित श्री जनता विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाच्या मैदानावर शिक्षण प्रसारक मंडळ तळवडे चे अध्यक्ष श्रीकृष्ण पेडणेकर यांच्या हस्ते श्रीफळ…

Read Full News

सावंतवाडीच्या साईश गावडेंचा कोल्हापुरात पुन्हा डंका!

‘शाहू सर्कलचा महाराजा’ रिल स्पर्धेत सलग तिसऱ्या वर्षी अव्वल कामगिरी; यंदा पटकावला तृतीय क्रमांक सावंतवाडी : आपल्या गुणवत्तेची आणि सर्जनशीलतेची छाप कोल्हापूरच्या भूमीत उमटवत सावंतवाडीच्या साईश गावडे यांनी पुन्हा एकदा उल्लेखनीय यश संपादन केले आहे. कोल्हापूर येथील ‘शाहू सर्कलचा महाराजा’ रिल स्पर्धेत साईशने यावर्षी तृतीय क्रमांक पटकावत सलग तिसऱ्या वर्षी अव्वल क्रमांकांमध्ये स्थान मिळविले आहे….

Read Full News

भाईसाहेब सावंत आयुर्वेद महाविद्यालयात डॉ. श्रीनिवास जाधव यांची सहयोगी प्राध्यापकपदी नियुक्ती…

⚡सावंतवाडी ता.२६-: येथील राणी जानकीबाईसाहेब वैद्यकीय संस्थेचे रुग्णालय व भाईसाहेब सावंत आयुर्वेद महाविद्यालयाच्या प्रसूती व स्त्रीरोग विभागात सहयोगी प्राध्यापक (Associate Professor) म्हणून प्रा. डॉ. श्रीनिवास जाधव (एम.एस., पीएच.डी.) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या नियुक्तीमुळे सावंतवाडी तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील माता व स्त्रीरुग्णांना स्थानिक पातळीवर तज्ज्ञ उपचाराची सुविधा उपलब्ध होणार आहे. डॉ. श्रीनिवास जाधव यांना प्रसूती…

Read Full News

अमली पदार्थ, अवैध धंद्यांविरोधात लेखणीचा एल्गार; ज्येष्ठ पत्रकार सीताराम गावडे यांना ‘सिंधुदुर्ग रत्न’!

३५ वर्षांच्या समाजाभिमुख पत्रकारितेची दखल; चुकीच्या प्रवृत्तींवर प्रखर लिखाण करणाऱ्या गावडे यांचा सावंतवाडी नागरी कृती समितीतर्फे गौरव सावंतवाडी : समाजातील वाईट प्रवृत्ती, अमली पदार्थांचे वाढते जाळे आणि अवैध धंद्यांविरोधात आपल्या लेखणीच्या माध्यमातून सातत्याने आवाज उठविणारे कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेलचे ज्येष्ठ पत्रकार तथा संपादक सीताराम गावडे यांना ‘सिंधुदुर्ग रत्न’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.सावंतवाडी नागरी कृती…

Read Full News

You cannot copy content of this page