Headlines

कमी तेथे आम्ही ग्रुपतर्फे विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप…

⚡मालवण ता.२०-:
कमी तेथे आम्ही या सामाजिक ग्रुप मार्फत वायरी, तारकर्ली व देवबाग मधील एकूण बारा शाळा व दोन हायस्कूल मधील विद्यार्थ्यांना सलग पाचव्या वर्षी शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.

कमी तिथे आम्ही या ग्रुपमध्ये सुमारे २८० सदस्य आजमितीस आहेत. हे सर्वजण आपल्या परीने दरवर्षी मे महिन्यात ग्रुपवर रक्कम गोळा करतात. या गोळा केलेल्या मदतीमधून सर्वसामान्य विद्यार्थ्यांची शैक्षणिक गरज पूर्ण केली जाते. ग्रुपचे सदस्य रक्कम गोळा करून माफक दरात स्व:खर्चाने सर्व साहित्य कोल्हापूरवरून समक्ष जाऊन घेऊन येतात. याद्वारे प्रतीवर्षी प्राथमिक शाळेतील आणि दोन हायस्कूल मधील सुमारे २४० विद्यार्थी लाभ घेतात.

यावर्षी या ग्रुपतर्फे १ लाख ८७ हजार रुपये एवढी रक्कम जमा झाल्यानंतर वायरी बांध शाळा, वायरी भूतनाथ शाळा,देवली हरिजणवाडी शाळा , तारकर्ली मत्स्य शाळा, देवबाग नंबर २ शाळा, देवली काळेथर शाळा , देवली खालची शाळा , देवबाग मोबारवाडी शाळा , ए के टिकम शाळा वायरी , सेंट पीटर चर्च स्कुल देवबाग , अंबाजी विद्यालय वायरी फातिमा आश्रम मालवण देवबाग हायस्कूल श्री रेकोबा हायस्कूल वायरी या शाळांमधील सुमारे २४० विद्यार्थ्यांमधील प्रत्येक मुलाला पाच वह्या, दप्तर, छत्री, पाण्याची बॉटल स्टीलमध्ये कंपास पेटी, पेन्सिल आणि कलर खडू इत्यादी साहित्य देण्यात आले. त्याचप्रमाणे सर्व अंगणवाडीला पाटी आणि पेन्सिल बॉक्स देण्यात आले. तसेच मालवण मधील फातिमा आश्रम मधील मुलींनाही शैक्षणिक साहित्य देण्यात आले. या सर्व उपक्रमासाठी कमी तेथे आम्ही या ग्रुपमधील सर्व सदस्यांनी मोलाचे योगदान दिले.

You cannot copy content of this page