⚡सावंतवाडी ता.२१-: आंतरराष्ट्रीय (जागतिक) योग दिनानिमित्त रविवारी, २१ जून रोजी मळगाव हायस्कूल येथे समाजसेवक नितेश तेली यांच्या संकल्पनेतून फिटनेस योग अकॅडमी, सावंतवाडी तसेच श्री दत्त पद्मनाभ पीठ, सद्गुरू योग गुरुकुल, गोवा यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आली. यानंतर योगाचे महत्त्व, निरोगी जीवनासाठी योगाची आवश्यकता तसेच नियमित योगाभ्यासामुळे होणारे शारीरिक व मानसिक लाभ याविषयी मार्गदर्शन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी विविध योगासने, प्राणायाम व ध्यानसाधनेची प्रात्यक्षिके सादर करून उपस्थितांकडून कौतुकाची थाप मिळवली.
यावेळी मळगाव इंग्लिश स्कूलचे मुख्याध्यापक मारुती फाले, पर्यवेक्षक विठ्ठल सावंत, समाजसेवक नितेश तेली, फिटनेस योग अकॅडमी, सावंतवाडीचे योग शिक्षक रामनाथ सावंत, जिल्हाध्यक्षा रसिका सावंत, चेतना शिंदे, अरुण पवार, निशा गवळी, समीर हडकर, महेश परब, दर्शना पेडणेकर, प्रगती बामणे, अनिशा घाडी, रुपाली पेडणेकर, काशीनाथ पेडणेकर तसेच श्री दत्त पद्मनाभ पीठ, सद्गुरू योग गुरुकुल गोवा येथील योग शिक्षक भूतनाथ बाचोळकर, दिनानाथ काळोजी आणि कनक काळोजी यांच्यासह विद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
योग हा भारतीय संस्कृतीचा अमूल्य वारसा असून निरोगी, तणावमुक्त आणि संतुलित जीवनासाठी योगाचा अवलंब करणे काळाची गरज असल्याचा संदेश यावेळी देण्यात आला. कार्यक्रमाला विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
