Headlines

मालवणात उद्या सामूहिक योग सत्राचे आयोजन…

⚡मालवण ता.२०-:
आंतरराष्ट्रीय योग दिना निमित्त मालवण नगरपरिषद आणि स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालय (NCC विभाग) यांच्या संयुक्त विद्यमाने विशेष सामूहिक योग सत्राचे आयोजन दि. २१ जून रोजी सकाळी ठीक ८ ते ८.४५ यावेळेत मालवण बंदर जेटी येथे आयोजित करण्यात आले आहे.

या कार्यक्रमास जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे या प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते आणि प्रमुख उपस्थितीत हा योग दिन साजरा केला जाणार आहे. तरी सर्व शासकीय विभागाचे अधिकारी व कर्मचारी यांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहावे, असे आवाहन मालवण नगरपरिषदेचे मुख्याधिकारी प्रतीक थोरात यांनी केले आहे.

You cannot copy content of this page