Global Maharashtra Breaking News

संपाला प्राथमिक, उच्च माध्यमिक मुख्याध्यापक संघाचा बाहेरून पाठिंबा

वैभववाडी प्रतिनिधी सरकारी,निमसरकारी कर्मचारी, व शिक्षक संघटना समन्वय समिती महाराष्ट्र राज्य या संघटनेच्या वतीने आयोजित संपामध्ये प्राथमिक व उच्च प्राथमिक मुख्याध्यापक संघाने बाहेरून पाठिंबा देत असल्याचे प्रसिद्धीपत्रकात द्वारे जाहीर केले आहे. सदरचा निर्णय राज्याध्यक्ष श्री.अशोक वैद्य. व सरचिटणीस रामू अमरापूरकर.यांनी राज्य कार्यकारणीच्या वतीने घेतला आहे. असे सिंधुदुर्ग जिल्हा अध्यक्ष श्री. संतोष कदम यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे…

Read More

दिगशी गावात शिवजयंती उत्साहात

शिवप्रेरीत युवा संघटनेचे आयोजन वैभववाडी ता.२१-:* दरवर्षीप्रमाणे दिगशी गावातील शिवप्रेरीत युवा संघटना यांनी आयोजित केलेला शिवजयंती उत्सव सोहळा थाटामाटात पार पडला. या कार्यक्रमाची सुरुवात सकाळी ११ वाजता वैभववाडी तालुक्याचे तहसीलदार श्री. रामदास झळके व पोलीस अधिकारी PSI श्री. देसाई यांच्या प्रमुख उपस्थितीत छत्रपतींच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून व पूजन करून करण्यात आली. यावेळी शिवरांच्या जयघोषाने…

Read More

आशा स्वयंसेविकेना कोविड प्रोत्साहन भत्ता द्या

नगराध्यक्षांना आशा स्वयंसेविकेंचे निवेदन देवगड ता.२१-: देवगड जामसंडे नगरपंचायत हद्दीतील आशा स्वयंसेविकाना नगरपंचायत निधीमधून देण्यात येणारा कोव्हिडं -१९ प्रोत्साहन भत्ता मिळावा या मागणीचे निवेदन देवगड जामसंडे हद्दीतील १० आशा स्वयंसेविकानी नगराध्यक्ष देवगड जामसंडे नगरपंचायत यांचेकडे दिले आहे. या निवेदनात नमूद केल्या प्रमाणे गेली दोन वर्षे जागतिक कोव्हिडं १९ संक्रमण काळात आशा स्वयंसेविकानी आरोग्य यंत्रणेसोबत सेवा…

Read More

कणकवली पं. स.तर्फे 50% सवलत दरात वॉटर फिल्टर व घरघंटी वितरण

आ.नितेश राणे यांचे प्रयत्न कणकवली ता.२१-:* भारतीय जनता पार्टीच्यावतीने आमदार नितेश राणे यांच्या विशेष प्रयत्नातून सर्वसामान्यांना परवडणारे वॉटर फिल्टर व घरघंटी 50 टक्के सवलत दरात विक्रीचे वितरण कणकवली पंचायत समितीच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे स्टॉल उभारून करण्यात आले. या स्टॉलचे उदघाटन जिल्हा परिषद अध्यक्ष संजना सावंत यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले. यावेळी सभापती…

Read More

पेट्रोलपंप ते वेळवाडी रस्ता करा

नगरसेविका तन्वी चांदोस्कर यांचे मुख्याधिकाऱ्यांना निवेदन देवगड ता.२१ देवगड जामसंडे नगरपंचायत हद्दीतील देवगड जामसंडे नगरपंचायत हद्दीतील पेट्रोलपंप ते वेळवाडी रस्ता काम सुरू करावे .अशी मागणी नगरसेविका तन्वी चांदोस्कर यांनी लेखी पत्राद्वारे मुख्यधिकारी देवगड जामसंडे नगरपंचायत यांचेकडे केली आहे. या निवेदनात नमूद केल्याप्रमाणे रा. मा. क्र.१७८ ते जामसंडे कावलेवाडी इ.जि. मा.१५ मिळणारा मार्ग क्र १६३ रस्ता…

Read More

मालवण-रत्नागिरी प्रवासी फेरी उद्यापासून सुरू

देवगड– : रापम मालवण आगारातून सकाळी ८.०० सुटणारी मालवण आचरा मार्गे देवगड पडेल नाटे जैतापूर पावस मार्गे रत्नागिरी या मार्गावर मालवण रत्नागिरी ही प्रवासी फेरी २२ फेब्रुवारी पासून सुरू करण्यात आली आहे. सदर प्रवासी फेरी देवगड येथे मालवणहून स.९.४५ वा. येणार आहे.तसेच परतीच्या प्रवासा करीता साय .५वा. देवगड हुन मार्गस्थ होणार आहे .या प्रवासी फेरीचा…

Read More

मडुरा-रोणापाल-पाडलोस रस्त्याचे खडीकरण करा

ग्रामस्थांनी वेधले आमदारांचे लक्ष : अनेक वर्षांची प्रलंबित मागणी बांदा ता.२१-:* मागील आर्थिक वर्ष २०१९-२० मध्ये मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या आराखड्यात मडुरा आयनकर ते रोणापाल, पाडलोस भाकरवाडी-केणीवाडा रस्त्याचा समावेश करण्यात आला होता. परंतु कोरोना परिस्थितीमुळे रखडलेले कामाचा आता चालू आर्थिक वर्षांच्या आराखड्यात समावेश करावा, अशी मागणी रोणापाल शाखाप्रमुख मंगेश गावडे तसेच अन्य ग्रामस्थांनी माजी पालकमंत्री तथा…

Read More

हुमरठ येथे गोवा बनावटीच्या दारु वाहतुकीविरोधात कारवाई

आठ लाखांचा मुद्देमाल ताब्यात : कोल्हापूर भरारी पथकाने केली कारवाई बांदा ता.२१-:* मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर हुमरठ येथे गोव्यातून सिंधुदुर्गकडे होणार्‍या गोवा बनावटीच्या दारु वाहतुकी विरोधात एक्साइजच्या कोल्हापूर भरारी पथकाने कारवाई केली आहे. या कारवाईत गोल्डन एसब्ल्यू व्हिस्कीच्या ७५० मिलीच्या एकूण ७९२ दारुच्या बाटल्या पकडण्यात आल्या. तसेच दारु वाहतुकीसाठी वापरलेली कार (एमएच ०७ क्यू १७००) असा…

Read More

२३ आणि २४ फेब्रुवारी रोजी पुकारलेल्या शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या संपात सर्व कर्मचाऱ्यांनी व्हावे सहभागी…

शिक्षकेत्तर संघटनेचे अध्यक्ष अनिल राणे व सचिव गजानन नानचे यांचे आवाहन सावंतवाडी ता.२१-:* शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांसंदर्भात २३, २४ रोजी पुकारलेल्या दोन दिवसीय संपात शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सहभागी व्हावे असे आवाहन सिंधुदुर्ग जिल्हा माध्यमिक, उच्च माध्यमिक व अध्यापक विद्यालय शिक्षकेतर कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष अनिल राणे व सचिव गजानन नानचे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे. महाराष्ट्र राज्यातील शिक्षक-शिक्षकेतर…

Read More

एरंडवाकवाडी रस्त्याच्या डांबरीकरण कमाचे सरपंच विनोद राऊळ यांच्या हस्ते भूमिपूजन …

*⚡सावंतवाडी ता २१-:* बराच कालावधीपासून प्रतीक्षेत असलेल्या नेमळे एरंडवाकवाडी ते मार्ग क्र 17 ला जोडणाऱ्या रस्त्याच्या डांबरीकरणाच्या कामाचे सरपंच विनोद राऊळ यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले यावेळी ग्रामस्थांनी सरपंच श्री राऊळ यांचे आभार व्यक्त केले        सदर रस्त्याच्या खडीकरण व डांबरीकरणासाठी ग्राम निधी सन 2021 22 मधुन निधी मंजूर होता  या कामाचे आज भूमिपूजन…

Read More
You cannot copy content of this page