भाविकांच्या सेवेसाठी भाजपचा उपक्रम; सावंतवाडी तालुक्यातील बुथ अध्यक्ष व शक्ती केंद्रप्रमुखांना पूजा साहित्य पिशव्यांचे वाटप..
⚡सावंतवाडी ता.१२-: महाराष्ट्र भाजपा युवानेते विशालजी परब यांच्या पुढाकाराने व भारतीय जनता पार्टीच्या वतीने आज सावंतवाडी तालुक्यातील सावंतवाडी, बांदा व आंबोली मंडलातील सर्व बुथ अध्यक्ष तसेच शक्ती केंद्रप्रमुख यांना भाविकांसाठी पूजा साहित्य पिशव्यांचे वाटप करण्यात आले.
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर भाविकांना धार्मिक पूजेसाठी आवश्यक साहित्य सहज उपलब्ध व्हावे, तसेच भक्तिमय वातावरणात सेवाभाव जपला जावा, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला. मंडलातील विविध बुथवर या पूजा साहित्य पिशव्या भाविकांपर्यंत पोहोचविण्यात येणार आहेत.
यावेळी यांच्यासमवेत जि. प. सदस्य नितीन राऊळ, कास सरपंच प्रविण पंडीत, बाळा जाधव, संतोष बिले, स्वप्नील राऊळ, केतन आजगांवकर, धिरेंद्र म्हापसेकर, बंटी जामदार, विजू साटेलकर आदी उपस्थित होते.
भाविकांची सेवा, सामाजिक बांधिलकी आणि धार्मिक परंपरांना पाठबळ देण्याच्या उद्देशाने राबविण्यात आलेल्या या उपक्रमाचे सर्व स्तरांतून स्वागत होत आहे.
