Headlines

खड्डे बुजविण्याचे काम नगरसेवकांच्या सूचनेनुसारच..

मोहिनी मडगावकरांचे स्पष्टीकरण: उगाच कोणी श्रेय घेण्याच प्रयत्न करू नये, माजी नगरसेविका दिपाली सावंत यांना नाव न घेता टोला..

⚡सावंतवाडी, ता. १२-: शहरातील खड्डे बुजविणे तसेच स्वच्छता मोहीम राबविण्याचा निर्णय भाजपच्या सर्व नगरसेवकांच्या बैठकीत घेण्यात आला होता. त्यानुसार न्यू सबनिसवाडा येथील खड्डे बुजविण्याचे काम नगरसेवकांच्या सूचनेनुसारच करण्यात आले आहे. त्यामुळे एखाद्या ठिकाणी जाऊन केवळ फोटो काढून या कामाचे श्रेय घेण्याचा प्रयत्न करू नये, असा टोला नगरसेविका मोहिनी मडगावकर यांनी लगावला.

मडगावकर म्हणाल्या की, प्रभागातील विकासकामे ही संबंधित नगरसेवकांच्या सूचनेनुसार आणि नगराध्यक्षांच्या मार्गदर्शनाखाली केली जातात. भाजपच्या नगरसेवकांच्या बैठकीत शहरातील खड्डे आणि स्वच्छतेचा प्रश्न प्राधान्याने चर्चिला गेला होता. त्यानंतर शहरातील विविध भागांतील खड्डे बुजविण्याचे काम हाती घेण्यात आले आहे.त्यामुळे न्यू सबनिसवाडा येथील खड्डे आपल्या प्रयत्नांमुळे बुजविण्यात आल्याचे भासवून कोणीही श्रेय घेऊ नये. शहरातील ही कामे नगराध्यक्षांच्या सूचनेनुसारच होत आहेत, असे स्पष्ट करत मडगावकर यांनी नाव न घेता माजी नगरसेविका दीपाली सावंत यांच्यावर निशाणा साधला.

You cannot copy content of this page