Headlines

देवबाग हायस्कुलच्या दोन विद्यार्थ्यांची जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड

मालवण (प्रतिनिधी)

युवक व क्रीडा संचालनालय महाराष्ट्र राज्य आणि जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने जय गणेश इंग्लिश मीडियम स्कूल, मालवण येथे आयोजित करण्यात आलेल्या तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत डॉ.दत्ता सामंत इंग्लिश स्कूल देवबाग च्या विद्यार्थ्यांनी सुयश संपादन केले आहे. बाल गटात खेळताना प्रशालेच्या दोन विद्यार्थ्यांनी आपापल्या वजनी गटात प्रथम क्रमांक पटकावून जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेसाठी आपली निवड निश्चित केली आहे.

तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत बाल गट मुलांच्या ३८ किलो वजनी गटातून देवबाग हायस्कुलचा इयत्ता सातवीतील संकल्प कमलाकर खोबरेकर याने उत्कृष्ट पकड आणि कौशल्याच्या जोरावर प्रथम क्रमांक पटकावला. तर बाल गट मुलींच्या ५० किलो वजनी गटातून इयत्ता सहावीतील मनस्वी उत्तम राऊळ हिने प्रतिस्पर्ध्यावर मात करत प्रथम क्रमांक मिळवला. या दोन्ही खेळाडूंची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. झालेल्या

या यशाबद्दल प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ. रचना रुपेश खोबरेकर, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, तसेच अखिल देवबाग विकास मंडळ, मुंबई संस्थेचे सर्व पदाधिकारी, सदस्य आणि ग्रामस्थांकडून दोन्ही खेळाडूंचे अभिनंदन करण्यात आले.

You cannot copy content of this page