अनुसूचित जाती मोर्चा जिल्हाध्यक्ष पदाचा अंकुश जाधव यांचा राजीनामा

प्रदेशाध्यक्ष भालेकर यांच्याकडे पाठविला राजीनामा

ओरोस ता ६      भारतीय जनता पार्टी सिंधुदुर्गच्या अनुसूचित जाती मोर्चा जिल्हाध्यक्ष अंकुश जाधव यांनी आपल्या पदाचा राजीनामा प्रदेशाध्यक्ष सुधाकर भालेराव यांच्याकडे दिला आहे. वैयक्तिक कारणास्तव आपण राजीनामा देत असल्याचे अंकुश जाधव यांनी राजीनामा पत्रात नमूद केले आहे.      अंकुश जाधव हे सलग दहा वर्षे जिल्हा परिषद सदस्य होते. मावळत्या कार्यकारिणीत ते होते. यातील साडेसात वर्षे ते समाजकल्याण सभापती होते. ते जिल्ह्यातील मागास प्रवर्गातील धडाडीचे नेतृत्व आहे. प्रशासकीय अभ्यास व संभाषण कौशल्य असल्याने अधिकारी वर्गावर त्यांची पकड आहे. विशेष म्हणजे ज्या समाजाचे ते नेतृत्व करीत आहेत. तेथे त्यांना मानणारा मोठा वर्ग आहे. त्यामुळेच भाजप या पक्षाने त्यांच्याजवळ अनुसूचित मोर्चा जिल्हाध्यक्ष हे पद दिले होते.     मात्र, त्यांनी आज अचानक आपल्या पदाचा राजीनामा दिला असल्याने राजकीय चर्चा रंगू लागली आहे. राजीनामा पत्रात त्यांनी वैयक्तिक कारण म्हटले आहे. अनुसूचित मोर्चा जिल्हाध्यक्ष असताना पक्षाच्या वरिष्ठ पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी सहकार्य केल्याने त्यांचे ऋण सुद्धा त्यांनी व्यक्त केले आहेत. दरम्यान, जिल्ह्यातील तीन नगरपरिषदा, जिल्हा परिषद, आठही पंचायत समित्या व बहुसंख्य ग्राम पंचायती येत्या सहा महिन्यांत होवू घातल्या आहेत. त्यामुळे जाधव यांचा जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा भाजपसाठी अडचणीचा ठरणारा आहे.

फोटो :- अंकुश जाधव

You cannot copy content of this page