प्रभागनिहाय आरक्षण सोडतीवर घेतला आक्षेप
कणकवली ता.०६-:* जिल्ह्यातील ज्या ग्रामपंचायतीचा ५ वर्षाचा कार्यकाळ पूर्ण होत आलेला आशा काही जिह्यातील ग्रामपंचातीच्या भविष्यातील होणाऱ्या ग्रामपंचायत निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्या करिता संपूर्ण जिल्ह्यात प्रभागनिहाय आरक्षण सोडत जाहीर करण्या करीता घेण्यात आलेल्या ग्रामसभेमध्ये खारेपाटण ग्रामस्थांनी प्रभागनिहाय आरक्षण सोडतीला हरकत घेत ग्रामस्थांना कोणत्याही प्रकारे विश्वासात न घेता बनविण्यात आलेल्या प्रभाग रचनेला कडाडून विरोध केला.
याबाबत अधिक वृत्त असे की खारेपाटण ग्रामपंचायतीच्या भविष्यात होणाऱ्या निवडणूक संदर्भात आरक्षण सोडतीबाबत आज खारेपाटण ग्रामपंचायत कार्यालयात खास ग्रामसभेचे प्रशासनाच्या वतीने असयोजन करण्यात आले होते.कणकवली तहसीलदार यांच्या नियुक्त करण्यात आलेल्या अध्यसी अधिकारी तथा कृषी अधिकारी श्री धीरज तोरणे यांच्या अध्यक्षतेखाली सम्पन्न झालेल्या या ग्रामसभेला खारेपाटण सरपंच रमाकांत राऊत,ग्रामपंचायत सद्स्य महेंद्र गुरव,योगेश पाटणकर,शमशुद्दीन काझी,सौ अंजली कुबल,उज्वला चिके,आरती कर्ले,सोनल लोकरे,आशा ब्रम्हदंडे,यांसह माजी सर्पमच लियाकत काझी,सामाजिक कार्यकर्ते गफार काझी,संतोष पाटणकर,मंगेश गुरव,खारेपाटण व्यापारी असोसिशन चे माजी अध्यक्ष सुधीर कुबल,खारेपाटण सोसायटीचे व्हाईस माजी चेअरमन विजय देसाई,राजेंद्र वरूनकर, तसेच खारेपाटण ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सदर ग्रामसभेत अफहयसी अधिकाऱ्यांनी सभेला सुरवात करून आरक्षण विषयी माहिती देत असतात ग्रामस्थांनी आक्षेप घेत प्रथम प्रभाग रचना कोणी बदलली? व ग्रामस्थांना विश्वासात का घेतले नाही ? असा सवाल ग्रामस्थ श्री गफार काझी यांनी आदयसी अधिकारी तथा ग्रामसभेचे अद्यक्ष याना विचारून आमचा याला विरोध असल्याचे जाहीर केले. ग्रामस्थांना अंधारात ठेऊन केलेल्या प्रभाग रचनेला आमचा सर्वच विरोध असल्याचे ग्रामस्थांनी आक्रमक होत सांगितले. तर सामाजिक कार्यकर्ते संतोष पाटणकर यांनी आरक्षण सोडत प्रक्रियेला विरोध करीत खारेपाटण येथील अनु.जाती तथा बौद्ध बांधवांवर ग्रामपंचायत स्थापणेपासून अन्याय झाला असुन,खारेपाटण गावचे सरपंच पद हे गेल्या ५० वर्षाच्या कालावधी मध्ये एकदा देखील अनु.जाती करिता आरक्षित झालेले नाही किंवा अनु.जातीचे आरक्षण पडलेले नाही. त्यामुळे आमचा प्रभाग रचनेसह आरक्षण सोडत प्रक्रियेला देखील विरोध असल्याचे ग्रामसभेत सांगितले.
प्रभाग क्र.३ मध्ये मतदार लोकसंख्या ९३५ असताना देखील तेथे फक्त २ उमेदवार दिले आहेत.याला काझीवाडी,संभाजी नगर ग्रामस्थांनी विरोध केला.व येथे पूर्वी प्रमाणे ३ उमेदवार देण्यात यावेत अशी मागणी केली.तर लोकसंख्येच्या निकषानुसार प्रभाग उमेदवार संख्या ठेवणे कमी करू नये. तसेच सध्याची खारेपाटण ग्रामपंचायतीची असलेली लोकसंख्या ही फार कमी गृहीत धरली असून अधिकृत सर्व्हे केल्यास ती अधिक आढळेल.त्यामुळे खारेपाटण ग्रामपंचयतीची सद्याची उमेदवार संख्या ११ अशे ती २ ने वाढवून ती १३ करण्यात यावी अशी मागणी देखील ग्रामस्थांनी या ग्रामसभेत केली. तर शेवटी ग्रामस्थांनी सभेमध्ये अध्यसी अधिकारी यांचे म्हणणे ऐकून न घेता सभा तहकूब करून विरोध करीत निधून गेले.
” ग्रामपंचायत निवडणूक प्रभाग रचना नमुना परिशिष्ट -२ यादी यापूर्वी प्रसिद्ध करण्यात आली होती. मात्र त्यावेळी ग्रामस्थांनी हरकत घ्यायला हवी होती. तरी सुद्धा ग्रामस्थांच्या ज्या काही हरकती असतील तर त्यांचा प्रशासनाच्या वतीने विचार केला जाईल.असे नायब तहसीलदार एस व्ही राठोड यांनी सांगितले. दरम्यान दुपारी १.३० वाजता नायब तहसीलदार एस व्ही राठोड यांनी खारेपाटण ग्रामपंचायतीला भेट देऊन ग्राविकास अधिकारी जि सी वेंगुर्लेकर,तलाठी के सिगनाथ यांची भेट घेऊन माहिती जाणून घेतली.व आजच पुन्हा एकदा ग्रामस्थानशी चर्चा करून ग्रामपंचायत सदस्य आरक्षण सोडत कार्यक्रम जाहीर करण्यात येईल असें संगीतले.
