जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष घालावा, पंढरी वायगंणकर यांची मागणी
कणकवली ता.०६-:* कणकवली तालुक्यातील कासार्डे परिसरातून सिलिका मायनिंग धारकांकडून बेसुमार वाळू मिश्रीत दूषित पाणी कासार्डे- पियाळी नदी पात्रात पुन्हा सोडण्यात आले. या गढूळ पाण्याचा कोळोशी तलाठी प्रवीण लुडबे यांनी घटनास्थळी भेट देत पंचनामा केला आहे.या गंभीर समस्येकडे जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांनी लक्ष घालावे,अशी मागणी असलदे सरपंच पंढरी वायगंणकर यांनी केली आहे.
नदीत गढूळ पाणी आल्याने आरोग्यासाठी धोकादायक आहे.कारण या नदीवर सर्व गावांच्या नळयोजना आहेत. तसेच गुरे व बकऱ्या या नदीपात्रात पाणी पिण्यासाठी जातात,त्या जनावरांना त्रास होत आहे.हे दूषित पाणी तातडीने बंद करावे,अशी मागणी असलदे सरपंच पंढरी वायगंणकर यांनी केली आहे.
पाण्याला वास येत हे पाणी फेसाळलेले आहे.नदी पात्रात दूषित पाणी सोडणाऱ्या लोकांवर तातडीने कारवाई करण्यात यावी,अशी मागणी असलदे सरपंच पंढरी वायगंणकर यांनी केले आहे. यावेळी तलाठी प्रवीण लुडबे,कोतवाल मिलींद मेस्त्री, असलदे सरपंच पंढरी वायगंणकर, भाई मोरजकर,कमलेश पाटील,आनंद तांबे,मधुसूदन परब,संतोष घाडी, व अन्य उपस्थित होते.
