धामापूर तलाव परिसरात प्रशासनाकडून स्वच्छता मोहीम

मालवण ता.०६-:* मालवण तालुक्यातील धामापूर तलाव परिसरात जागतिक पर्यावरण दिनानिमित्त स्वच्छता करण्यात आली. यात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर यांच्या पुढाकारातून जिल्ह्यातील व मालवण नगरपालिकेतील अधिकारी वर्ग, आरोग्य कर्मचारी, जिल्ह्यातील नामांकित कराटे वर्ग-व्हाईट आर्मीचे विद्यार्थी, – काळसे ग्रामपंचायत कर्मचारी व धामापूर‍ काही ग्रामस्थांनी स्वच्छतेमध्ये सहभाग घेऊन ‘पर्यावरण दिन’ साजरा केला.

जागतिक वारसा स्थळ सन्मान प्राप्त धामापूर तलावाचे संरक्षण आणि संवर्धन करण्याच्या दृष्टीने पर्यावरण दिनाचे औचित्य साधून या स्वच्छता मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. प्रशासन आणि सामान्य नागरिक यांनी एकत्र येऊन राबविलेल्या या स्वच्छता मोहिमेत लहान मुलांपासून ते ज्येष्ठ अधिकारी वर्गापर्यंत सर्वांनी यात सक्रिय सहभाग दर्शविला.

या मोहिमेत कुडाळच्या ‘व्हाईट आर्मी’च्या मुलांनीही सहभाग घेतला. यावेळी धामापूर परिसरात मोठ्या प्रमाणावर प्लास्टिक, काचा, कापड, ओला कचरा, इलेक्ट्रॉनिक वस्तू अशा कचऱ्याचे संकलन करण्यात आले. यासाठी धामापूर सरपंच सत्वशीला धामापूरकर, धामापूर ग्रामसेवक, काळसे सरपंच केशव सावंत यांचे सहकार्य लाभले. दिले. गोळा केलेला सर्व कचरा धामापूर सरपंच धामापूरकर आणि उपसरपंच यांनी वेंगुर्ले येथील कचरा डेपोमध्ये रिसायकलसाठी पाठविण्यात येणार असल्याचे सांगितले.

You cannot copy content of this page