वेंगुर्ले ता.०६-:* तालुक्यातील तुळस जैतीर देवस्थान येथील मंदीरानजीक भाविकांच्या सोईसाठी बांधण्यात आलेल्या भक्तनिवास इमारतीचा उदघाटन आज (६ जून) आमदार दिपक केसरकर यांच्या हस्ते करण्यात आले.
दक्षिण कोकणातील जागृत व प्रसिद्ध देवस्थान वेंगुर्ले तुळस येथील श्री देव जैतीर देवस्थान चे भक्तनिवास भाविकांसाठी आज पासून खुले करण्यात आले. आमदार दीपक केसरकर यांनी पालकमंत्री असताना १५ लाखांचा निधी यासाठी दिला होता. सध्या जैतीर उत्सव तुळस येथे सुरू असून याचे औचित्य साधून या भक्तनिवासचा उदघाटन आमदार केसरकर यांच्या हस्ते फित कापून करण्यात आले. यावेळी समस्त गावकर मंडळी, देवस्थान कमिटी व ग्रामस्थ यांच्या वतीने आमदार केसरकर यांचा प्रमुख मानकऱ्यांच्या हस्ते शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
त्यावेळी माजी पं. स. सभापती यशवंत परब, सरपंच शंकर घारे, उपसरपंच सुशिल परब, देवस्थान कमिटी अध्यक्ष तथा प्रमुख मानकरी अध्यक्ष अनिल परब, सचिव विजय रेडकर, मानकरी बाबा परब, हनुमंत राऊळ, बाबू मेस्त्री, रमाकांत परब, के.डी. परब, भगवान परब, सुभाष परब, बाळू राऊळ, ग्रा. प. सदस्य जयवंत तुळसकर, चंद्रे परब, शेखर तुळसकर, शिवसेना उपजिल्हाप्रमुख सुनिल डूबळे, बाळा दळवी, जिल्हा कार्यकारणी सदस्य सचिन वालावलकर, विभाग प्रमुख संजय परब, सुनील तुळसकर, समीर शेटकर, गुंडू परब, तुषार राय, माजी सरपंच आपा परब, भाजप युवमोर्चाचे तालुका सरचिटणीस नारायण कुंभार यांच्यासाहित ग्रामस्थ उपस्थित होते.
यावेळी बोलताना आमदार केसरकर म्हणाले की, श्री देव जैतीरचे दर्शन घेण्यासाठी लाखो भाविक याठीकाणी येत असतात त्यांची योग्य व्यवस्था होते गरजेचे असल्याने हे भाकनिवास याठिकाणी उभे आहे या भक्तनिवासला लागून टॉयलेटसाठी जिल्हा नियोजन मधून निधी देण्यात येईल तर समोरच्या भागात स्टाईल्स बसवण्याबाबत सुद्धा प्रस्ताव द्यावा. तसेच शेतकरी, बागायतदार यांच्या हितासाठी, महिलांना रोजगार मिळावा यासाठी जे प्रकल्प हाती घेतले आहेत ते पूर्ण व्हावेत अशी जैतीर चरणी प्रार्थना केले असल्याचे आमदार केसरकर यांनी सांगितले.
