मातृत्व आधार फाऊंडेशनचा पुढाकार
मालवण दि प्रतिनिधी मालवण ग्रामीण रुग्णालयात पुरेशा सुविधा नसतानाही डॉ. बालाजी पाटील यांनी दिलेली वैद्यकीय सेवा ही उल्लेखनीय आहे. शांत, संयमी स्वभावाने प्रामाणिक सेवा देत डॉ. पाटील यांनी मालवण ग्रामीण रुग्णालयाची पत उंचावली. कोरोना महामारीच्या काळात प्रतिकूल परिस्थितीत डॉ. पाटील यांनी दिवसरात्र झटत रुग्णांची केलेली सेवा मालवणची जनता कधीही विसरू शकणार नाही, अशा भावना मातृत्व आधार फाउंडेशनतर्फे डॉ. बालाजी पाटील यांच्या नागरी सत्कार कार्यक्रमप्रसंगी मान्यवरांनी व्यक्त केल्या.
मालवण ग्रामीण रुग्णालयात गेली पाच वर्षे प्रभारी वैद्यकीय अधीक्षक म्हणून काम करणारे डॉ. बालाजी पाटील हे सेवांतर्गत उच्च शिक्षणासाठी सोलापूर येथे बदली होऊन जातं असल्याने मालवण मधील मातृत्व आधार फाउंडेशन या सामाजिक सेवाभावी संस्थेतर्फे डॉ. बालाजी पाटील यांचा नागरी सत्कार दैवज्ञ भवन येथे आयोजित कार्यक्रमात करण्यात आला.यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष मालवणचे ज्येष्ठ डॉ. सुभाष दिघे यांच्या हस्ते शाल, श्रीफळ, सन्मानपत्र व पुष्पगुच्छ देऊन डॉ. पाटील यांना सन्मानित करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर सौ.आरती पाटील, माजी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर,मालवणचे पोलीस निरीक्षक विजय यादव, उपनिरीक्षक श्री. झांझुर्णे, संस्थेचे अध्यक्ष आपा चव्हाण, संस्थापक संतोष लुडबे, माजी नगरसेवक दीपक पाटकर, डॉ. पळसंबकर, डॉ. केंद्रे आदी उपस्थित होते.
यावेळी आप्पा चव्हाण यांनी प्रास्ताविक करत डॉ. बालाजी पाटील यांच्या कार्याचा आढावा घेतला. तर संतोष लुडबे यांनी डॉ. बालाजी पाटील यांनी कोरोना महामारी काळात दिवसरात्र दिलेल्या रुग्णसेवेची माहिती देत डॉ पाटील यांच्या कार्यपद्धतीचा गौरव केला तर माजी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांनी डॉ. पाटील यांच्या कार्याचे कौतुक करतानाच ग्रामीण रुग्णालयात ज्या सेवा सुविधा आवश्यक आहेत त्या सातत्याने डॉ. पाटील यांनी लक्षात आणून दिल्यामुळेच त्याची पूर्तता करण्याचा प्रयत्न आम्ही करू शकलो असे सांगितले.
यावेळी डॉ. दिघे यांनी डॉ. पाटील यांनी ग्रामीण रुग्णालयातील प्रतिकूल परिस्थितीत केलेल्या कार्याचे कौतुक करतानाच खासगी डॉक्टरांनी ग्रामीण रुग्णालयात पाठविल्यावर डॉ. पाटील यांनी नेहमीच सहकार्य करत योग्य उपचार रुग्णांवर केल्याचे सांगितले. यावेळी संस्थेचे संस्थापक श्री संतोष लुडबे , पोलीस निरीक्षक विजय यादव, विनायक कोळंबकर यांनीही विचार मांडत डॉ. पाटील यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी समाजकार्यात योगदान दिल्याबद्दल बाबू ढोले, चारुशीला देऊलकर, फॅनी फर्नांडिस यांचाही सत्कार करण्यात आला. तसेच मालवणचे पोलीस निरीक्षक विजय यादव यांचा यथोचित सत्कार करण्यात आला तसेच एकता मित्रमंडळ व महेश कांदळगावकर यांच्यातर्फे डॉ. पाटील यांना सन्मानित करण्यात आले.
डॉ पाटील यांच्या कार्याचा गौरव करणाऱ्या सन्मानपत्राचे वाचन प्रफुल्ल देसाई यांनी केले. सुत्रसंचालन विनोद सातार्डेकर यांनी केले. तर आभार सेक्रेटरी विश्वास गावकर यांनी मानले. यावेळी परशुराम पाटकर, दादा वेंगुर्लेकर, अनिल मालवणकर, शेखर गाड, सुधीर धुरी, प्रभूदास आजगावकर,अविनाश सामंत, दिलीप घारे, दादा वेंगुर्लेकर, सौ. नमिता गावकर, सौ. तृप्ती मयेकर, मेघा गावकर, रवी मालवणकर, उमेश सांगोडकर, अमेय देसाई, मंदार ओरसकर, जयमाला मयेकर, विजय चव्हाण, सौ. दीक्षा गावकर, सौ. राधिका मोंडकर मनोज लुडबे, अनिता पारकर, विजय नेमळेकर, उत्तम पेडणेकर, माजी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख संजय लुडबे, संजय हंजणकर, नीना मुंबरकर ,संतोष नागवेकर, माजी प्राचार्य श्रीपाद गिरसागर, दलाल, अनिल कुडाळकर, संदीप लुडबे, संदीप नेवाळकर, धोंडी नेरकर,संतोष दांडकर, जगदिश तोडणकर, बाबू मोरजकर, सुधीर धुरी, विद्या मेस्त्री, अरूण लुडबे, विजय तळगांवकर , सौ ..श्रमिका लुडबे, कु .दिक्षा लुडबे, व इतर संस्थेचे पदाधिकारी, हितचिंतक, सदस्य व नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते .
