तहसीलदारांच्या आश्वासनानंतर उपोषण केले स्थगित
देवगड ता.०६-:* देवगड तहसीलदार कार्यालयातील पुरवठा विभाग तसेच तालुक्यातील कुवळे येथील रास्त दराच्या धान्य दुकानातून वारंवार मागणी करूनही धान्या पासून वंचित असलेल्या सुमारे ४० लाभार्थ्यांनी देवगड तहसीलदार कार्यालयासमोर सोमवारी सकाळी ११ वाजलेपासून बेमुदत उपोषण सुरू केले होते.
त्यावेळी देवगड तहसीलदार मारुती कांबळे यांनी पुरवठा अधिकारी समवेत उपोषकर्त्याशी चर्चा करून यावर आवश्यक ती कार्यवाही करून वंचित लाभार्थ्यांना-आवश्यक त्या कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर निकषानुसार नागरिकांना रास्त दराच्या धान्य दुकानातून धान्य पुरवठा करण्याबाबत योग्य ती कार्यवाही करण्यात येईल असे लेखी आश्वासन दिल्यानंतर तूर्तास उपोषण स्थगित करण्यात आल्याची माहिती तक्रारदार अनिल भास्कर लाड,व भाजप जिल्हा कार्यकारणी सदस्य संदीप साटम यांनी दिली .
या वेळी उपोषणकर्ते समवेत माजी जि प सदस्य सुभाष नार्वेकर माजी सभापती नंदू देसाई,आरे उपसरपंच महेश पाटोळे कुवळे ग्रामस्थ सचिन घाडी, दिलदास कदम,प्रतीक्षा पडवळ,सुलोचना खाडये,वृषाली पडवळ,प्रकाश तर्फे,उपस्थित होते आपल्या न्याय मागणी करिता कुवळे येथील ग्रामस्थांनी देवगड तहसीलदार कार्यलयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले होते.देवगड तहसीलदार मारुती कांबळे, तसेच पुरवठा निरीक्षक शिवाजी चव्हाण यांनी या तक्रारीबाबत सविस्तर चर्चा उपोषकर्त्याशी केली.
व येत्या आठ दिवसात योग्य ती कार्यवाही करून वंचित लाभार्थ्यांना निकषानुसार धान्य पुरवठा करण्यातयेईल.दरम्यान तहसीलदार यांनी उपोषण मागे घ्यावे म्हणून दिलेल्या पत्रात नवीन लोकांना धान्य मंजूर करावयाचे असल्यास स्थानिक ग्रामपंचायत मार्फत किंवा संबंधित शिधापत्रिका धारक हमीपत्र भरून कार्डावरील सर्व व्यक्तींची आधारकार्ड व शिधा पत्रिका झेरॉक्स द्यावी त्यानंतर पुढील कार्यवाही करण्यात येईल असे लेखी पत्र दिले आहे. या उपोषणस्थळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून,पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र कांबळे,सहा. पोलीस उपनिरीक्षक,प्रमोद डगरे, महिला पोलीस नाईक विनिता भुजे यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.
