कणकवलीत प्लास्टिक मुक्त पर्यावरण संवर्धन रॅली

कणकवली ता.०६-:* कणकवली नगरपंचायत स्वच्छ सर्वेक्षण व माझी वसुंधरा अभियान अंतर्गत जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधत प्लास्टिक मुक्त पर्यावरण संवर्धन रॅलीचे आयोजन कणकवलीत करण्यात आले. कणकवली पटकी जवळजवळ या रॅलीचा शुभारंभ नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला.

या जनजागृती रॅली मध्ये कनक सिंधू शहर स्तर संघ सहभागी झाला होता. यावेळी आरोग्य सभापती संजय कामतेकर, नगरसेविका सुप्रिया नलावडे, मेघा गांगण, कणकवली नगरपंचायतचे ब्रँड ॲम्बेसिडर दीपक बेलवलकर व कणकवली रोटरी क्लबच्या वर्षा बांदेकर, आरोग्य विभागाचे कर्मचारी प्रशांत बुचडे, नगरपंचायत चे किशोर धुमाळे स्वच्छता निरीक्षक विनोद सावंत, रवी महाडेश्वर, प्रशांत राणे, सतीश कांबळे आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page