Headlines

Global Maharashtra Breaking News

आरोस येथे बिबट्याचा मुक्त संचार…

बलाढ्य भीमाच्या सतर्कतेमुळे बिबट्या पळाला:बिबट्या वारंवार मानवी वस्तीत येत असल्याने भीतीचे वातावरण.. ⚡सावंतवाडी ता.०७-: आरोस नाबरवाडी येथील मानवी वस्तीत गेले दोन महिने वारंवार नर व मादी जातीचा बिबट्या घराच्या आवारात येत असून यामुळे गावात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.आरोस येथील रहिवासी शैलेश गजानन नाबर यांच्या घराच्या अंगणात तसेच आरोस परिसरात बिबट्याच्या मुक्त संचारामुळे भितीचे वातावरण…

Read Full News

विधानपरिषद आमदार प्रमोद जठार यांचा वेंगुर्ला येथे भाजपातर्फे सत्कार…

⚡वेंगुर्ला ता.०७-: भाजपाचे प्रमोद जठारयांची महाराष्ट्र विधानपरिषद आमदारपदी निवड झाल्याबद्दल वेंगुर्ला येथे भाजपाच्या वतीने त्यांचे जल्लौषी स्वागत करण्यात आले. आज गुरुवारी वेंगुर्ला तालुका भाजपा कार्यालयात ज्येष्ठ नेते शरदजी चव्हाण व सिंधुदुर्ग जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी यांच्या हस्ते त्यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्ना उर्फ बाळू देसाई, जिल्हा…

Read Full News

बांदा पोलीस ठाण्यात पंकज शिंदे यांचा पदभार स्वीकारला…

⚡बांदा ता.०७-: येथील पोलीस ठाण्यात सहाय्यक पोलीस निरीक्षक म्हणून पंकज शिंदे यांनी आज पदभार स्वीकारला. यापूर्वी त्यांनी सावंतवाडी पोलीस ठाण्यात कार्य करताना उल्लेखनीय सेवा बजावली होती. त्यांच्या अनुभवाचा फायदा बांदा परिसरातील कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी होणार असल्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.दरम्यान, बांदा पोलीस निरीक्षक गजेंद्र पालवे यांच्या रत्नागिरी बदलीनंतर त्यांनी आपला पदभार शिंदे यांच्या हाती…

Read Full News

शेतकऱ्यांची कामे आणि त्यांच्या योजना त्यांच्या बांधापर्यंत घेऊन जा …

आमदार निलेश राणे यांच्या अधिकाऱ्यांना कडक सूचना:कुडाळ मालवण मधील शेतकऱ्यांसाठी खरीप हंगाम आढावा बैठक.. कुडाळ : शासनाकडून शेतकऱ्यांसाठी एवढ्या चांगल्या योजना असून त्या योजना कृषी विभागाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांकडून राबविल्या गेल्या तर या ठिकाणचा शेतकरी आर्थिक समृद्ध होईल, असे आमदार निलेश राणे यांनी सांगून यापुढे शेतकऱ्यांच्या बाबतीत कोणतीही सबब ऐकून घेतली जाणार नाही. शेतकऱ्यांची कामे आणि…

Read Full News

कणकवली शहराला अवकाळी पावसाने झोडपले…

उष्म्याने हैराण नागरिकांना दिलासा ; व्यापाऱ्यांची मात्र धांदल. कणकवली :कणकवली शहरासह परिसरात गुरुवारी सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास अवकाळी पावसाने अचानक जोरदार हजेरी लावली. सकाळपासून असलेल्या कडक उन्हामुळे हैराण झालेल्या नागरिकांना या पावसामुळे काहीसा दिलासा मिळाला असला, तरी अचानक आलेल्या या संकटामुळे व्यापारी वर्गाची मात्र मोठी त्रेधातिरपीट उडाली. दिवसभर उष्मा, सायंकाळी अंधार कणकवलीत गुरुवारी सकाळपासूनच वातावरणात…

Read Full News

सावंतवाडी शहर भाजपा युवा मोर्चा कार्यकारिणी जाहीर…

⚡सावंतवाडी ता.०७- : भारतीय जनता पक्षाच्या युवा मोर्चाच्या माध्यमातून युवकांना नेतृत्वाची संधी देत सावंतवाडी शहर कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते भाजपा युवा मोर्चा सावंतवाडी शहर कार्यकारिणीची अधिकृत घोषणा करण्यात आली. यावेळी महाराष्ट्र भाजपा युवा नेते विशाल परब, सावंतवाडी उपनगराध्यक्ष अनिल निरवडेकर, पंचायत समिती उपसभापती गौरव मुळीक तसेच युवा मोर्चा शहर…

Read Full News

आरोग्य आणि विकासावर भाजपचा भर…

दोडामार्गसाठी प्रमोद जठार यांची मोठी घोषणा.. .दोडामार्ग :दोडामार्ग तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी केंद्रापासून ग्रामपंचायत स्तरापर्यंत भाजपची सत्ता असल्याने आगामी काळात विकासकामांना मोठी गती मिळणार असल्याचा विश्वास विधानपरिषद सदस्य आमदार प्रमोद जठार यांनी व्यक्त केला. भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते जनतेच्या प्रश्नांसाठी सातत्याने काम करत असून, पुढील पाच वर्षांत तालुक्यातील अनेक प्रलंबित प्रश्न मार्गी लागतील, असे त्यांनी सांगितले.आमदार…

Read Full News

सावंतवाडी वैश्य वाणी युवा संघटनेतर्फे आमदार प्रमोद जठार यांचे केले अभिनंदन…

​ ⚡​सावंतवाडी ता.०७-:सावंतवाडी येथील वैश्य वाणी युवा संघटनेच्या वतीने आमदार श्री. प्रमोद जठार यांचे विशेष अभिनंदन करण्यात आले. सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील त्यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी संघटनेच्या वतीने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.​याप्रसंगी संघटनेचे अध्यक्ष अमित गवंढळकर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने जठार साहेबांची भेट घेऊन त्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी समाजाच्या विविध प्रश्नांवर आणि आगामी उपक्रमांवरही…

Read Full News

माडखोल येथे पर्यटकांची स्विफ्ट कार पलटी…

दुपारी अडीच ची घटना:सहा प्रवासी किरकोळ जखमी.. ⚡सावंतवाडी ता.०७-: सांगलीहून सावंतवाडीच्या दिशेने येणारी पर्यटकांची स्विफ्ट कार (एम.एच. ४३ एक्स ६९९५) माडखोल येथील सावली हॉटेलजवळील वळणावर पलटी होऊन अपघातग्रस्त झाली. ही घटना आज दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास घडली. या कारमध्ये एकूण सहा प्रवासी प्रवास करत होते. अपघातात सर्वांना किरकोळ दुखापत झाली असून सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली…

Read Full News

“महिला संरक्षणासाठी भाजप कार्यकर्त्यांनी ‘स्त्री रक्षण ब्रिगेड’ उभी करावी”…

आमदार प्रमोद जठार: विशाल परब यांनी केले प्रमोद जठार यांच जंगी स्वागत.. ⚡सावंतवाडी ता.०७-: महिलांच्या रक्षणाची जबाबदारी सरकारची असली तरीही भाजपच्या कार्यकर्त्यांनी आपली वेगळी ब्रिगेड उभी करावी, स्त्री रक्षणासाठी ब्रिगेड म्हणून काम करावं असे आवाहन नवनिर्वाचित आमदार प्रमोद जठार यांनी केले. तसेच प्रमोद जठारच मन विशाल आहे. शतप्रतिशत भाजप करण्यासाठी मन विशाल ठेवून एकदिलाने काम…

Read Full News

You cannot copy content of this page