विधानपरिषद आमदार प्रमोद जठार यांचा वेंगुर्ला येथे भाजपातर्फे सत्कार…

⚡वेंगुर्ला ता.०७-: भाजपाचे प्रमोद जठार
यांची महाराष्ट्र विधानपरिषद आमदारपदी निवड झाल्याबद्दल वेंगुर्ला येथे भाजपाच्या वतीने त्यांचे जल्लौषी स्वागत करण्यात आले. आज गुरुवारी वेंगुर्ला तालुका भाजपा कार्यालयात ज्येष्ठ नेते शरदजी चव्हाण व सिंधुदुर्ग जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी यांच्या हस्ते त्यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्ना उर्फ बाळू देसाई, जिल्हा परिषद शिक्षण व आरोग्य सभापती प्रितेश राऊळ, वेंगुर्ला नगराध्यक्ष दिलीप उर्फ राजन गिरप, उपनगराध्यक्ष सुहास गवंडळकर, शिवसेना जिल्हा समन्वयक सचिन वालावलकर, जिल्हा कार्यकारिणी सदस्य साईप्रसाद नाईक, वेंगुर्ला पं. स.सभापती शंकर घारे, भाजपा महिला शहर अध्यक्ष श्रेया मयेकर, नगरसेवक प्रणव वायंगणकर, प्रीतम सावंत, सदानंद गिरप, विनय नेरूरकर, तातोबा पालयेकर,
आकांक्षा परब, शीतल आंगचेकर, सुषमा प्रभूखानोलकर,
काजल कुबल, रिया केरकर, गौरी माईणकर, आसोली
पं. स. सदस्य संकेत धुरी, वायंगणी पं.स.सदस्य शितल राऊत, मच्छिमार नेते दादा केळूसकर, माजी नगरसेविका साक्षी पेडणेकर, तालुका कार्यकारिणी सदस्य भूषण सारंग, शिरोडा माजी उपसरपंच राहुल गावडे, आरवली येथील पदाधिकारी
यांच्यासह तालुक्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.

You cannot copy content of this page