Headlines

आरोस येथे बिबट्याचा मुक्त संचार…

बलाढ्य भीमाच्या सतर्कतेमुळे बिबट्या पळाला:बिबट्या वारंवार मानवी वस्तीत येत असल्याने भीतीचे वातावरण..

⚡सावंतवाडी ता.०७-: आरोस नाबरवाडी येथील मानवी वस्तीत गेले दोन महिने वारंवार नर व मादी जातीचा बिबट्या घराच्या आवारात येत असून यामुळे गावात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.
आरोस येथील रहिवासी शैलेश गजानन नाबर यांच्या घराच्या अंगणात तसेच आरोस परिसरात बिबट्याच्या मुक्त संचारामुळे भितीचे वातावरण पसरले आहे.
गेले दोन महिने हा नर व मादी जातीचा बिबट्या शिकार शोधण्यासाठी मानवी वस्तीत येत असून, आरोस नाबरवाडी येथील शैलेश नाबर यांच्या बलाढ्य भीमा व इतर पाळीव श्वानांच्या सतर्कतेमुळे बिबट्याचा हा डाव फसत असून,या श्वानांमुळे घरातील तसेच वाडीतील ग्रामस्थांना सतर्कता राहण्यास मदत होत आहे.
शैलेश नाबर यांनी लावलेल्या सिसिटीव्ही कॅमेरा फुटेज मध्ये सदरील नर व मादी जातीचा बिबट्या अगदी मुक्त संचार करत असल्याचे दिसून येत असून,याबाबत श्री. नाबर यांनी संबंधित वन विभागाला या संदर्भात माहिती देताच वनविभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल होत,शोध मोहीम घेत माहिती घेतली.मात्र सदरील बिबट्या हा मादी जातीचा असून,वनविभागाच्या कर्मचाऱ्यांच्या माहिती प्रमाणे,ती (बिबट्या) नुकतीच व्यायलेली मादी असल्याने, पिंजऱ्यात पकडवून तिला स्थलांतरित करणे योग्य नसल्याचे सांगित.
मात्र वारंवार या बिबट्यांच्या मुक्त वापरामुळे गावात भितीचे वातावरण पसरले असून,संबंधित वनविभागाने या बाबत गावातील नागरिक तसेच पाळीव प्राणी यांच्या सुरक्षेबाबत योग्य ती तत्काळ कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
मात्र सद्य स्थितीत जंगलात मानवी हस्तक्षेपामुळे होणारी वृक्षतोड,यामुळे वने नष्ट होत असल्याने जंगलातील प्राणी मानवी वस्तीत येण्याचे प्रमाण वाढले असून पाळीव प्राण्यावरील हल्ले सुद्धा वाढल्याचे दिसत आहे.

You cannot copy content of this page