⚡बांदा ता.०७-: भारतीय जनता पार्टी सिंधुदुर्गच्या वतीने बांदा मंडळ अध्यक्षपदी मधुकर देसाई यांची नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी नियुक्तीपत्र देत ही घोषणा केली.
दि. ०२ मे २०२६ रोजी जारी करण्यात आलेल्या नियुक्तीपत्रानुसार, मधुकर देसाई यांची नियुक्ती तात्काळ प्रभावाने लागू करण्यात आली आहे. त्यांच्या नियुक्तीमुळे बांदा परिसरातील भाजप संघटन अधिक मजबूत होईल, असा विश्वास कार्यकर्त्यांकडून व्यक्त केला जात आहे.
यावेळी पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून मधुकर देसाई यांचे अभिनंदन करण्यात आले असून, आगामी काळात पक्ष संघटन वाढीसाठी ते प्रभावीपणे कार्य करतील, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.
