⚡बांदा ता.०७-: भारतीय जनता पार्टीच्या बांदा मंडल अंतर्गत संघटनात्मक बांधणी अधिक मजबूत करण्याच्या दृष्टीने विविध पदांवर नियुक्त्या करण्यात येत आहेत. भाजप बांदा मंडलच्या मन की बात प्रमुख पदावर सिद्धेश महाजन यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
नवनिर्वाचित विधानपरिषद आमदार प्रमोद जठार यांच्या हस्ते भाजप बांदा मंडल अध्यक्ष मधुकर मोहन देसाई यांच्या उपस्थितीत ही नियुक्ती करण्यात आली. आ. प्रमोद जठार यांच्या हस्ते त्यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले.
सिद्धेश महाजन हे पक्षाच्या विविध उपक्रमांमध्ये सक्रिय असून स्थानिक स्तरावर कार्यकर्त्यांशी त्यांचा चांगला संपर्क आहे. त्यांच्या नियुक्तीमुळे बांदा मंडलातील संघटनात्मक कामकाजाला अधिक गती मिळेल, असा विश्वास भाजप पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.
यावेळी पक्ष संघटन अधिक मजबूत करणे, केंद्र व राज्य शासनाच्या योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविणे तसेच “मन की बात” कार्यक्रम प्रभावीपणे राबविण्यासाठी काम करण्याचे आवाहन करण्यात आले.
नियुक्तीनंतर सिद्धेश महाजन यांनी पक्ष नेतृत्वाचे आभार मानत दिलेली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडणार असल्याचे सांगितले. पक्षाची विचारधारा तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी कार्यरत राहणार असल्याचे त्यांनी नमूद केले. निवडी बद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
फोटो –
सिद्धेश महाजन यांना मन की बात बांदा प्रमुख पदाचे नियुक्तीपत्र देताना आमदार प्रमोद जठार. सोबत मंडल अध्यक्ष मधुकर देसाई व अन्य.
