विठ्ठल पार्टे यांच्याकडून वराडकर हायस्कुलला मदत
⚡मालवण ता.२०-: कट्टा येथील वराडकर हायस्कुलचे माजी विद्यार्थी विठ्ठल रामचंद्र पार्टे (कुणकवळे बागवाडी) यांनी आपल्या आई कै. श्रीमती लक्ष्मीबाई रामचंद्र पार्टे यांच्या स्मरणार्थ वराडकर हायस्कुल कट्टाच्या शैक्षणिक उपक्रमासाठी सुमारे २१ हजारांची देणगी संस्था सचिव विजयश्री देसाई यांच्याकडे धनादेश स्वरूपात सुपूर्द केली.
