१९ व २० मार्च रोजी आयोजन; लाभ घेण्याचे राजू मसुरकर यांचे आवाहन
सावंतवाडी ता.०८-:* जिल्ह्यामध्ये अथायु हॉस्पीटल, कोल्हापूर यांच्याकडून महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे यात 19 मार्च रोजी स 10 ते दु 2साटेली – भेडशी, 20 मार्च स 10 ते दु 2 सावंतवाडी तर दु 3 ते 6 ह्या वेळेत कुडाळ येथे हा महाआरोग्य शिबीर पार पडणार असून गरजू रुग्णांनी याचा लाभ घेण्याचे आवाहन जीवनरक्षा वैद्यकीय प्रतिष्ठान अध्यक्ष राजू मसुरकर यांनी केले आहे.
यावेळी हृदयविकार, हाडाचे विकार, कॅन्सर विकार, मेंदू व मणका विकार ,किडणी विकार, मुतखडा व प्रोस्टेट तपासणी केली जाणार आहे महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजना अत्तर्गत पिवळे व केशरी रेशन कार्ड व आधार कार्ड धारकांना अँजिओप्लास्टी,बायपास शस्त्रक्रिया,मुतखडा, प्रोस्टेट, हाडाचे फ्रॅक्चर, अर्थोस्कॉपीद्वारे गुडघ्याचे लिगामेंट शस्त्रक्रिया , कॅन्सर शस्त्रक्रिया मोफत केल्या जाणार आहे साटेली-भेडशी ता .दोडामार्ग येथील शिबिर हा सार्वजनिक गणेश मंडपच येथे, सावंतवाडी येथील शिबीर हा काझी शहाबुद्दीन हॉल, एसटी स्टँड नजीक, प्रांत ऑफिस समोर. तर कुडाळ येथील शिबीर हा दैवज्ञ भवन, कुडाळेश्वर मंदिर रोड, छत्रपती शिवाजी नगर जवळ पार पडणार आहे
