जिल्ह्यातील तरुणांना योग्य दिशा देण्याचे काम एस एस आय इन्स्टिट्यूट करेल

कौशल्य विकास कार्यक्रमात अपर निवासी जिल्हाधिकारी दत्तात्रय भडकवाड यांचा विश्वास

सावंतवाडी ता.०८-:* कोकणात आपण जास्त सेवा दिली आहे. त्यामुळे कोकणावर आपले जास्त प्रेम आहे. या जिल्ह्याला पर्यटन जिल्हा म्हणून ओळख प्राप्त असून, या जिल्ह्यात सागरी, कृषी या सोबतच धार्मिक पर्यटन मोठ्या प्रमाणात आहे. या भागातील तरुण शिक्षण घेतो परंतु, योग्य मार्गदर्शन न मिळाल्याने भरकटत चालला आहे. या तरुणांना योग्य दिशा देण्याचे काम नक्कीच एस एस आय इन्स्टिट्युट करेल असा विश्वास निवासी अप्पर जिल्हाधिकारी दत्तात्रय भडकवाड यांनी प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना केंद्राच्या उद्घाटन प्रसंगी बोलताना व्यक्त केला.

यावेळी ते पुढे म्हणाले की, या इन्स्टिट्युट मधून शिक्षण घेऊन बाहेर पडणारे विद्यार्थी नक्कीच गरुड भरारी घेतील आणि जिल्ह्याच्या विकासात योगदान देतील असा विश्वास देखील त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे.

You cannot copy content of this page