कणकवली ता.०८-:* महिलांनी रूढी,परंपरा, चालीरिती या चौकटीतून बाहेर पडून शैक्षिणक व आर्थिकदृष्ट्या सक्षम होणे गरजेचे आहे.महिलांनी आपल्या हक्क व अधिकार काय आहेत.याबाबत माहिती असणे आवश्यक आहे .
तसेच समाजात स्त्री पुरुष यांच्या निर्माण झालेली.विषमतेची दरी दूर करण्यासाठी समाजातील सर्व घटकांनी पुढाकार घ्यावा,असे आवाहन कणकवली दिवाणी न्यायालयाचे न्यायाधीक्ष सलीम जमादार यांनी केले. कणकवली नगरपंचायत दीनदयाळ अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजिविका अभियान अंतर्गत हिरकणी लोकसंचलित साधन केंद्र कणकवली व कनकसिंधु शहर स्तर संघ यांच्या संयुक्त विद्यमाने महिला मेळावा व सांस्कृतिक कार्यकमांचे आयोजन करण्यात आले होते याचे उद्घाटन विविध क्षेत्रांतील मान्यवरांच्या हस्ते झाले. तसेच बचत गटांचा सत्कार उपस्थितीत मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.या प्रसंगी न्या.जमादार बोलत होते. यावेळी जिल्हा बँकेच्या संचालिका प्रज्ञा ढवण नगरसेविका सुप्रिया नलावडे , मेघा सावंत,अँड विराज भोसले,गोपुरीचे रवींद्र मुसळे,पत्रकार विवेक ताम्हणकर,सहाय्यक प्रकल्प अधिकारी अमोल भोगले,क्षेत्रीय समन्वयक सिद्धी नलावडे, हिरकणीच्या व्यवस्थापक सीमा गावडे,कनकसिंधु शहर वस्ती संघाच्या अध्यक्षा सुचिता पालव , माऊली वस्ती संघाच्या अध्यक्षा दिव्या साळगावकर एकता वस्ती संघाच्या अध्यक्षा स्नेहा कदम , नवदुर्गा वस्ती संघाच्या प्रिया सरूडकर, सखी वस्ती संघाच्या अध्यक्षा विशाखा कांबळे, स्वाती राणे प्रणाली कांबळे,शुभांगी उबाळे,राजश्री पिळणकर,इशा कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते.
न्या जमादार पुढे म्हणाले, महिलांवर होणारे छळ,अत्याचार याविरोधात दाद मागण्यासाठी अनेक कायदे आहेत. या कायद्यांची माहिती महिलांनी असली पाहिजे तसेच महिलांना आपल्या हक्क व अधिकारांबाबत सजग असले पाहिजे.तसेच महिलांना आत्मनिर्भर बनण्यासाठी केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजना आहेत.या योजनांचा लाभ महिलांनी घेतला पाहिजे.याशिवाय महिलांनी चाकोरीबद्ध चौकटीतून बाहेर पडण्याची गरज आहे. यावेळी विवेक ताम्हणकर यांनी महिलांना मार्गदर्शन केले.यावेळी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला मान्यवरांनी पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन केले . सूत्रसंचालन मीरा गावडे यांनी केले . या मेळाव्यास मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या.
